महाराष्ट्र

CJP च्या आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार

Aaditya Thackeray Slams Devendra Fadnavis : आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा वाढू लागलाय. देशभरातील पाठिंबा यामुळे भाजपवर दबाव निर्माण झाला आहे.

Bharat Jadhav

  • आदित्य ठाकरे यांनी सीजेपी आंदोलनावरून देवेंद्र फडणवीसांवर जोरदार पलटवार केला.

  • भाजप आंदोलनामुळे दबावाखाली असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.

  • दिल्लीतील आंदोलनानंतर देशभरातील विरोधी पक्षांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.

दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. विविध विरोधी पक्षाचे नेते कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. दिल्लीच्या आंदोलनात पोलिसांनी लाठीचार्ज गेल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. तर शरद पवार थेट अभिजीत दीपकेची भेट घेतलीय. तर आंदोलनात बाहेरचे लोक घुसल्यानं लाठीचार्ज झाल्याची टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली. फडणवीसांच्या टीकेला आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलंय.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही उद्या 22 जुलै रोजी दिल्लीतील जंतर मंतरवर जाऊन आदोलकांची भेट घेणार आहेत. दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जनंतर देशभरातून संताप व्यक्त केला जातोय. आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनाही लक्ष्य केलंय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनाला फेसलेस म्हणत अराजक लोक आंदोलनात घुसल्याचा आरोपही केला होता. फेसलेस असलेल्या आंदोलनाने भाजपच्यात तोंडाला फेस आणल्याचा पलटवार आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी काय विधान केले?

दिल्लीत तरुण दोन आठवड्यापासून आंदोलन करत आहेत. सोमन वांगचुक यांची भेट घेण्यासाठी आमचे खासदार गेले होते. पण आमच्या खासदारांना भेटू दिले नाही. आपण बघितलं की संसद भवनला तरुणांनी मोर्चा काढला, आम्हाला वाटलं कोणी मंत्री त्यांना भेटेल, चर्चा करेल.

परंतु ब्रिटिशकालीन अत्याचारापेक्षा भयंकर अत्याचार पोलिसांनी केलेत असं आदित्य ठाकरे म्हणालेत. पोलिसांनी आंदोलनातील महिलांना मारलं, लहान मुलांना मारलं रॅपिड ऍक्शन फोर्सवाल्यांनी नावाच्या पाट्या काढल्या होत्या. याआधीही भाजप सरकारने शेतकऱ्यांना अर्बन नक्षल म्हटलं होतं.

वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक

वंचित बहुजन आघाडीकडून थेट महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलीय. द्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि पोलिसांच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी 'वंचित बहुजन आघाडी'ने २३ जुलै रोजी 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. समविचारी पक्ष, विद्यार्थी आणि समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांनी महाराष्ट्र बंद ला पाठिंबा द्या असा आवाहन केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत FDA ची ‘एन्ट्री’

September Rule Changes: दुधापासून ते LPG सिलिंडरपर्यंत... १ सप्टेंबरपासून बदणार हे ९ नियम; सर्वसामान्यांच्या बजेटवर होणार परिणाम

Crime : प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या समर्थकाला संपवलं, घराजवळच भयंकर हल्ला; शहरात प्रचंड खळबळ

Krishna Janmashtami 2026 : 4 की 5 सप्टेंबर? यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त

Dhaniya Panjiri Recipe : जन्माष्टमीला श्रीकृष्णासाठी खास नैवेद्य! 'अशी' बनवा फक्त १० मिनिटांत चविष्ट पंजिरी

SCROLL FOR NEXT