संजय सूर्यवंशी/ संदीप भोसले
नांदेड/ लातूर : राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या प्रवाशी भाडे वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हि भाडेवाढ लागू झाली असून या निर्णयामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. दरम्यान सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे काही ठिकाणी पडसाद उमटत असून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने भाडेवाढीच्या विरोधात आंदोलन केले आहे. नांदेड, लातूर व धाराशिवमध्ये ठाकरे गटाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
मध्यवर्ती बसस्थानकावर चक्काजाम
एसटी भाडेवाडीच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला असून ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी नांदेड शहरातील मध्यवर्ती बस स्थानकासमोर चक्काजाम आंदोलन केले. एकीकडे लाडक्या बहिणींना १५०० रुपये दिले जातात. तर दुसरीकडे एसटी बसची भाडेवाढ करून सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचे काम हे सरकार करत आहे; असा आरोप या शिवसैनिकांनी केले आहे. नांदेड जिल्ह्यातील एकूण नऊ आगारांसमोर हे आंदोलन करण्यात येत आहे.
लातूरमध्येही चक्काजाम आंदोलन
लातूर : राज्य सरकारने राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसचे १५ टक्के भाडेवाढ केल्यामुळे आता प्रवाशांसोबत राजकीय पक्ष देखील आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. लातूरच्या मध्यवर्ती बस स्थानकासमोर एसटी बस आडवत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी चक्काजाम आंदोलन केल आहे. तर यावेळी काहीकाळ बस देखील शिवसैनिकांनी रोखून धरल्या होत्या. तात्काळ भाडेवाढ निर्णय रद्द करावा, अशी मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली आहे.
धाराशिवमध्ये खासदार, आमदारही उतरले चक्काजाम आंदोलनात
धाराशिव : एसटी दरवाढीच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर उतरला आहे. याच पार्श्वभूमीवर आज धाराशिवमध्ये एसटी दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी सहभाग नोंदवला. यावेळी शहरातील बस स्थानकाच्या समोर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली,तर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.
आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
अचानक सुरू केलेल्या या आंदोलनामुळे रस्त्यावर बसच्या रांगा लागल्या होत्या. त्याच बरोबर प्रवाशांचा देखील खोळंबा झाल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान एसटीची भाडेवाढ रद्द करण्यात यावी; अन्यथा या पुढं देखील दरवाढी विवरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.