Uddhav and Raj Thackeray during their crucial 90-minute meeting at Shivtirtha discussing election strategy and alliance plans. Saam Tv
महाराष्ट्र

ठाकरे बंधुंच्या वाटाघाटी पूर्ण? ठाकरेंच्या युतीचा फॉर्म्युला ठरला?

Uddhav–Raj Thackeray Talks Finalised: ठाकरे बंधुंच्या युतीबाबत सर्व वाटाघाटी पूर्ण झाल्या आहेत....उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये शिवतीर्थावर झालेल्या दीड तासांच्या बैठकीत नेमकं काय घडलं? कोण किती जागा लढवणार?

Snehil Shivaji

वरळी डोममध्ये दोन्ही ठाकरे एकत्र आले आणि त्यानंतर राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटी दर आठवडा-पंधरवाड्याला होतायत....मात्र प्रत्येक भेटीत काही ना काही चर्चा रंगतायत...मात्र उद्धव ठाकरेंनी यावेळी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंशी तब्बल दीड तास चर्चा केली. यावेळी दोघांमध्ये राजकीय वाटाघाट्या झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. एवढंच नव्हे तर युतीचा फॉर्म्युलाही ठरल्याचं समजतंय.

ठाकरे बंधू सोबत राहून महायुतीला थोपवणार

आगामी निवडणुकीसाठी दोन्ही भाऊ मैदानात

संभ्रम असलेल्या जागांवर दोन्ही ठाकरे बंधू चर्चा करणार

मराठी मतदारांमधील संभ्रम दूर करण्यासाठी ताकद लावणार

एकमेकांची ताकद आजमावण्यापेक्षा एकमेकांना मदत करणार

हिंदीसक्तीच्या विरोधात एकत्र आल्यापासून सत्याच्या मोर्चापर्यंत राज -उद्धव यांचे मनोमीलन झाल्याचं दिसलंय. त्यामुळे शिवतीर्थावरील भेट महत्वाची मानली जातेय. या भेटीत निवडणूकांमध्ये दोघं भाऊ युती करुन महायुतीला रोखण्याची रणनिती तर ठरलीच आहे परंतू मविआ आणि जागावाटपासारख्या आणखीन महत्वाच्या विषयावर चर्चाही झालीये.

ठाकरे बंधूंमध्ये काय चर्चा?

महापालिका निवडणुकांवर खलबतं

जागावाटपातील पेचावर दोन्ही बंधूंची चर्चा

ठाकरेसेना, मनसे नेमक्या किती जागा लढवणार यावर चर्चा

मनसेला मविआत घेण्याबाबत राज ठाकरेंशी संवाद

मनसेला मविआत घेण्याबाबत उद्धव ठाकरेंचे प्रयत्न

राज ठाकरेंना मविआत घेण्यासाठी शरद पवार आणि काँग्रेसमधील काही नेते सकारात्मक आहे. त्यामुळे मनसे मविआत आली तर महायुतीसाठी मुंबईत मोठं आव्हान उभं राहणार असल्याची चर्चा आहे. परंतू सध्या या दोन भावांच्या थेट होणाऱ्या गाठी भेटी आणि चर्चांवरुन भविष्यातील युतीत कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी हे दोघे भाऊ विशेष काळजी घेत असल्याचं दिसतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT