Thackeray brothers’ unity may alter Mumbai’s political landscape ahead of BMC elections 2025. Saam Tv
महाराष्ट्र

Thackeray Brothers: मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंचं पारडं जड, 70 जागांवर मनसेची मतं निर्णायक?

Mumbai Civic Elections: मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंची युती होणार? हे जवळपास निश्चित झालयं... त्यातच मनसेची मतं मुंबई महापालिकेसाठी निर्णायक ठरणार असल्याचं बोलंल जातयं.. त्यामुळे ठाकरे ब्रँड महायुतीला कशी धडकी भरवणार?

Suprim Maskar

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंनी एकीची वज्रमुठ आवळलीय...त्यातच मुंबईतील 70 वॉर्डात मनसेची मतं पालिकेच्या सत्तेसाठी ठाकरे बंधूंना फायदेशीर ठरू शकतात...2024 मध्ये विधानसभा निवडणुकीत अनेक वॉर्डमध्ये महायुती आणि मविआच्या उमेदवारांमधील मतांच्या फरकापेक्षा मनसेच्या उमेदवारांना अधिक मतं मिळाली आहेत. या 67 वॉर्डपैकी 39 ठिकाणी ठाकरे गट आणि 28 वॉर्डमध्ये महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत...त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज-उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास उर्वरित 28 वॉर्डमध्येही ठाकरे गटाला विजय मिळू शकतो.. . त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी या लढतीत...

मुंबई महानगरपालिकेत एकूण 227 वॉर्ड आहेत... यातील 70 वॉर्डामध्ये मनसेची मतं निर्णायक ठरू शकतात. ज्या वॉर्डमध्ये महायुतीचे उमेदवार थोड्याशा फरकाने आघाडीवर आहेत. तिकडे मनसे गेमचेंजर ठरू शकते... मुंबईतील जवळपास 123 वॉर्डमध्ये मनसेची मतं दखलपात्र आहेत... त्याशिवाय मुंबईतील विशिष्ट मराठीबहुल भागांमध्ये मनसेला मानणारा मतदारवर्ग आहे.

गेल्या बऱ्याच काळापासून निवडणुकीत मनसेला फारसे यश मिळाले नसले तरी मुंबईतील विशिष्ट भागांमध्ये मनसे आपली ताकद राखून आहे. निवडणुकीचा निकाल काहीही लागो, कोणाच्याही बाजूने असो पण मुंबईतील काही भागात मनसेचे कट्टर समर्थक आहेत.. त्यामुळे मनसेची मतं 70 जागांवर कशी निर्णायक ठरू शकतात..

विधानसभा निवडणुकीत दिंडोशी मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 43 मध्ये मविआच्या उमेदवाराला महायुतीच्या उमेदवारापेक्षा केवळ 1088 मतं जास्त मिळाली. तर याचं वॉर्डात मनसे उमेदवाराला 1,728 मतं मिळाली होती. विक्रोळीतील वॉर्ड क्रमांक 121 मध्ये मविआ आणि महायुतीच्या उमेदवारात 843 मतांचा फरक होता तर मनसेला मिळालेली मते 1096 इतकी होती. जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 57 मध्ये महायुतीचा उमेदवार अवघ्या 482 मतांनी पुढे होता.तर मनसेला मिळालेली मतं ही 918 इतकी होती. वांद्रे पूर्वेला असणाऱ्या वॉर्ड क्रमांक 92 मध्ये मविआ आणि मनसेच्या मतांमधील फरक 623 इतका होता. तर मनसेने या वॉर्डमध्ये 1004 इतकी मतं मिळवली आहेत.

मनसेच्या पॉकेटसचा विचार करता मुंबई महानगरपालिकेच्या 70 वॉर्डचा निकाल मनसेमुळे फिरण्याची शक्यता आहे...त्यामुळे ठाकरे बंधूची महापालिका निव़डणुकीत युती झाल्यास महायुतीपुढे आव्हानं उभं राहणार आहे... अशातच आता ठाकरे बंधूंच्या युतीनंतर विखुरलेला मराठी मतदार ठाकरे ब्रँडमागे उभा राहणार का? महापालिकात मतदारांचा कौल नेमका कोणाला मिळणार? हे पाहणं महत्वाचं असेल...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांचा मास्टरस्ट्रोक; बड्या नेत्यासह ६ माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Shocking: दुःख डोंगराएवढं! आजारी मुलानं बापाच्या कुशीत डोळे मिटले, धक्का सहन न झाल्यानं बापाचाही हार्ट अटॅकनं मृत्यू

Bus Fire : नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती! प्रवाशांनी भरलेल्या AC बसला आग लागली; 12 जणांचा मृत्यू

Antibiotics Side Effects: अँटिबायोटिक्स घेताहेत भारतीयांचा जीव? WHO च्या इशाऱ्याने भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Fight Video: डेक्कन चौकात दहशत! नदीपात्रातील चौपाटीवरील हॉटेलमध्ये मारामारी

SCROLL FOR NEXT