Thackeray brothers’ unity could reshape the political power balance in Mumbai’s civic body. Saam Tv
महाराष्ट्र

मुंबईत ठाकरेंची रणनीती ठरली? ठाकरेंच्या एकीनं महापालिकेत बळ वाढलं

Mumbai BMC Battle: ठाकरे बंधूंची युती झाली... मात्र ठाकरेंच्या युतीचं भविष्य हे मुंबई महापालिकेतील 67 प्रभागांवर ठरणार आहे... त्यासाठी ठाकरे बंधू नेमकी काय ऱणनीती आखतायत? सत्तेचं गणित ठाकरे बंधू कसं जुळवून आणणार?

Suprim Maskar

मुंबई महापालिकेच्या सत्तेसाठी ठाकरे बंधू तब्बल 20 वर्षांनी एकत्र आले... दोन्ही बंधूंनी युतीची अधिकृत घोषणाही केली...मात्र ठाकरेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप गुलदस्त्यात आहे... अशातच मुंबई महापालिकेतील 67 प्रभाग ठाकरेंच्या सत्तेचं गणित ठरवणार आहे... ते प्रभाग नेमकं कोणते आहेत... आणि ठाकरेंच्या युतीनं भाजपची डोकेदुखी कशी वाढलीय?

2024च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने मुंबईत 25 उमेदवार उभे केले

25 पैकी 19 मतदारसंघांत मनसे-ठाकरेसेना आमनेसामने

वरळी, दिंडोशीमध्ये मतांची बेरीज निर्णायक

माहीममध्ये अमित ठाकरे, महेश सावंत आणि सदा सरवणकर यांची तिरंगी लढत

वॉर्ड 191 आणि 192मध्ये मनसे- ठाकरेसेनेची मते सरवणकरांपेक्षा दुप्पट

वरळीतील वॉर्ड 199-194मध्ये अमित ठाकरे-संदीप देशपांडे मतांची बेरीज निर्णायक

दिंडोशीतील 7 पैकी 6 प्रभागांत मनसेची मते विजयी मताधिक्यापेक्षा जास्त

वॉर्ड 37मध्ये सुनील प्रभू- भास्कर परबांच्या मतांची बेरीज निरुपमांपेक्षा अधिक

मनसे-ठाकरेसेना युतीमुळे मराठीबहुल पट्ट्यात ताकद वाढणार

मराठी बहुल मतदारसंघात ठाकरेसेना आणि मनसेची चांगलीच ताकद आहे.. अशातच दोन्ही पक्षांची युती झाल्यानं मराठी मताचं विभाजन टळणार आहे.. त्यातच दोन्ही पक्षांच्या मतांचं एकत्रीकरण महापालिकेत एकीचं बळ निर्माण करणार आहे... त्यात मराठी भाषेचा मुद्द्यावरून दोन्ही पक्षांनी आक्रमक भूमिका घेतल्यानं मुंबई महापालिकेत नेमका कोणाचा करिष्मा दिसून येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Dwarka: द्वारका चौकाची कोंडी फुटणार; २१४ कोटीच्या प्रकल्पाला मंजुरी, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय

धुक्यामुळे रस्ता दिसला नाही, प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, १५ जणांचा मृत्यू

Maharashtra Election: प्रशासनाचा भोंगळ कारभार; मयत शिक्षकाची मतदान अधिकारी पदी नियुक्ती

महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम, पुण्यात भाजप ठाम शिंदेसेनेला घाम

Maharashtra Live News Update: ठाण्यात प्रमोद गोगावले यांच्या समर्थनार्थ नागरिक रस्त्यावर.. परिसरात घोषणाबाजी

SCROLL FOR NEXT