भारताच्या नकाशात साकारली 29 विविध राज्यांची वस्त्रपरंपरा! विश्वभूषण लिमये
महाराष्ट्र

भारताच्या नकाशात साकारली 29 विविध राज्यांची वस्त्रपरंपरा!

परंपरेचे जतन करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य

विश्वभूषण लिमये

सोलापूर - भारत देश हा विविधता आणी परंपरेने नटलेला देश आहे. भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सोलापूर Solapur येथील युवा कलाकार कु.प्रणोती औदुंबर गोरे यांनी कोलाज कामातून भारताची अद्भुत अशी वस्त्र परंपरा दर्शविणारी टाकाऊ पासून टिकाऊ कलाकृती साकारली आहे. यामध्ये एकूण २९ राज्यांची वस्त्रे Cloth आणि त्यांचे वैशिष्ट्य दाखविण्यात आलेले असून हे सर्व वस्त्रप्रकार कु.प्रणोती यांनी स्वतः देखील परिधान केलेले आहेत.परंपरेचे जतन करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य असून यासाठी वस्त्र परंपरेबद्दल माहिती देणारी ही कलाकृती आहे असं त्यांनी सांगितलं .

भारत देशाच्या नकाशा आकारात दिसणारी ही कलाकृती खालील प्रकारे वस्त्रपरंपरा दर्शविते.

१.जम्मू आणि काश्मीर - पष्मीना

२.पंजाब - फुलकरी

३.हरियाणा - पांजा डुुरिज

४.उत्तरांचल - पंचचुली वीण

५.उत्तरप्रदेश -चिकनकरी

६.राजस्थान - शिशा

७.गुजरात - बांधणी

८.मध्य प्रदेश - चंदेरी

९.बिहार - भागलपुरी सिल्क

१०.झारखंड - कुचाई सिल्क

११.महाराष्ट्र - पैठणी

१२.कर्नाटक - मैसूर सिल्क

१३.केरळ - कासवू

१४.तामिळनाडू -कांजीवरम

१५.आंध्र प्रदेश - कलमकारी

१६.ओडिसा - संबलपुरी साडी

१७.अरुणाचल प्रदेश - अपतानी

१८.हिमाचल प्रदेश - कुल्लू शाल

१९.गोवा - कुणबी

२०.आसाम - मुगा सिल्क

२१.मणिपूर - फनेक

२२.मिझोराम - पूणस

२३.नागालँड - नागा शाल

२४.मेघालया - एरी सिल्क

२५.त्रिपुरा - पाचरा

२६.पश्चिम बंगाल - मलबेरी सिल्क

२७.छत्तीसगढ - कोसा सिल्क

२८.सिक्कीम - लेपचा

२९.तेलंगणा - पोचमपल्ली इकत

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT