TET PAPER LEAK: MAIN ACCUSED STILL ABSCONDING | NEET SCAM LINKS MAHARASHTRA UNDER SCANNER saam tv
महाराष्ट्र

TET पेपर फोडणारा मुख्य सूत्रधार मोकाटच, NEET पेपरफुटीचे 9 आरोपी राज्यात

NEET Row Sparks Nationwide Protests; एकीकडे नीट पेपरफुटीवरून देशभरात संतापाची लाट आहे. तर महाराष्ट्रात टीईटी पेपरफुटीतला मुख्य सूत्रधार महिनाभरानंतरही मोकाट आहे. नीटपाठोपाठ टीईटी पेपर फुटल्यामुळे आणि नीटचे बहुसंख्य आरोपी राज्यातले असल्यामुळे महाराष्ट्रा पेपरफुटीचा अड्डा बनलाय की काय? त्यावरचा हा रिपोर्ट........

Suprim Maskar

दिल्लीत नीट पेपरफुटीवरुन विद्यार्थ्यांच्या एक महिन्यापासून आंदोलन सुरु आहे. मात्र आतापर्यंत फुटलेल्या पेपर्समधील दोषींवर अजूनही कारवाई होत नसल्यानं संतापाची लाट पसरलीय. महाराष्ट्रात TET चा पेपर फुटून महिना उलटला तरी या प्रकरणातला मुख्य सूत्रधार आरोपी बिजेंद्र गुप्ता अद्यापही फरार आहे. भिवंडीतील एका नागरिकाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या रॅकेटचे धागेदोरे थेट आग्र्यातील मुद्रणालयापर्यंत पोहोचले. या प्रकरणात आतापर्यंत 13 जणांना अटक झालीय.

टीईटीच्या आधी नीट पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं होतं. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने 13 आरोपींना अटक केली. त्यातले 9 आरोपी महाराष्ट्रातील आहेत. तर दुसरीकडे पेपरफुटीवरुन राज्यात राजकारणही जोरात सुरु आहे. राज्यातील सर्वात मोठा TET घोटाळा ठाकरेंच्या काळात झाल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.

'राज्यातील सर्वात मोठा TET

घोटाळा ठाकरेंच्या काळात'

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

'ठाकरेंच्या काळात घोटाळा

झाला नाही, उघडकीस आला'

सुषमा अंधारे, उपनेत्या, ठाकरेसेना

दरम्यान, राज्य राखीव पोलीस दल (SRPF)गट क्रमांक ५, दौंड येथील सशस्त्र पोलीस शिपाई भरतीची २ मे २०२६ रोजी झालेली लेखी परीक्षाही रद्द करण्यात आली होती. कारण परीक्षेत १०० पैकी ८५ प्रश्न एका खासगी प्रकाशन संस्थेच्या पुस्तकातून जसेच्या तसे आल्याचा प्रकार समोर आला होता. तर दुसरीकडे महिना उलटूनही सरकारने टीईटीच्या नव्या परीक्षेची तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलाय. या कारणामुळे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी होतेय. या साऱ्या प्रकरणांमुळे महाराष्ट्र पेपरफुटीचा अड्डा झालाय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोल्हापुरात आंदोलनाच्या ५५ तासांनंतर जिल्हा प्रशासनाला जाग

Diwali 2026 : दिवाळीच्या फराळात वापरला जाणारा खवा शुद्ध की भेसळयुक्त? कसे ओळखाल

सर्वाधिक गोल करणाऱ्या 'किंग'चा फुटबॉलला अलविदा; रोनाल्डोची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती,चाहत्यांना अश्रू अनावर

MSRTC Employees diwali bonus 2026 : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात; एकाच वेळी बोनस, अॅडव्हान्स आणि महागाई भत्त्याची घोषणा

Train Travel Rules: प्रवासात बॅग ट्रेनमध्ये विसरलात? घाबरू नका, 'या' सोप्या पद्धतीने परत मिळेल तुमचे सामान

SCROLL FOR NEXT