Pulwama Attack
Pulwama Attack ANI
महाराष्ट्र

Pulwama Attack : काश्मिरी पंडितांवर गोळीबार; दहशतवादी हल्ल्यात एकाचा मृत्यू!

Ruchika Jadhav

Pulwama Attack : पुलवामामधून एक मोठी बातमी समोर येत आहे. आज (रविवारी)पुन्हा एकदा पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. काश्मिरी पंडित संजय शर्मा यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये शर्मा यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच हल्लेखोरांनी गोळीबार केल्यावर तात्काळ तेथून पळ काढला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे. (Latest Pulwama Attack News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शर्मा पुलवामाच्या अचन परिसरात राहतात. रविवारी सकाळी काही कामानिमित्त संयज शर्मा घराबाहेर बाजारात आले होते.यावेळी दहशतवाद्यांनी त्यांना घेरलं आणि थेट त्यांच्यावर गोळीबार करण्यास सुरूवात केली. गोळी लागल्याने ते रस्त्यावर पडले.

बाजार परिसरात हा गोळीबार झाला. त्यामुळे नागरिक देखील भयभीत झाले आणि धावपळ सुरू झाली. हल्लेखोरांनी लगेच तेथून पळ काढला. त्यामुळे तेथे उपस्थित इतर व्यक्तींनी शर्मा यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

एकाच आठवड्यात दोन हल्ले

शुक्रवारी देखील पुलवामामध्ये दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला होता. रात्रीच्या वेळी आसिफ अली नमाज अदा करून घरी परतत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. बिजबिहारा भागातील हसनपोरा तवेला परिसरात त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case : 'माझ्याबाबत जे घडलं ते,...; मारहाणीच्या घटनेनंतर आप नेत्या स्वाती मालीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

Mega block : मध्य रेल्वेवर आजपासून पंधरा दिवस ब्लॉक; कोणत्या मार्गांवर होणार परिणाम? जाणून घ्या

Maharahstra Election: अजित पवार गेले कुठे? अखेरच्या टप्प्यात अजित पवारांची प्रचाराकडे पाठ?

Shirur Lok Sabha Election 2024: हडपसर ठरवणार शिरूरचा खासदार?, संसदेत कोण जाणार कोल्हे की आढळराव?

Maharashtra Politics 2024 : मोदींच्या सभेत कांद्यावरून गोंधळ; नाशिकच्या भाषणात तरुणाची घोषणाबाजी

SCROLL FOR NEXT