Pulwama Attack: पुलावामा हल्ल्याला आज 3 वर्ष पूर्ण! भारताच्या इतिहासातील 14 फेब्रुवारी 2019 हा काळा दिवस

३ वर्षांपासून हा दिवस देशाकरिता आणि भारताच्या जवानाकरिता काळा दिवस ठरलेला
Pulwama Attack: पुलावामा हल्ल्याला आज 3 वर्ष पूर्ण! भारताच्या इतिहासातील 14 फेब्रुवारी 2019 हा काळा दिवस
Pulwama Attack: पुलावामा हल्ल्याला आज 3 वर्ष पूर्ण! भारताच्या इतिहासातील 14 फेब्रुवारी 2019 हा काळा दिवसSaam Tv
Published On

वृत्तसंस्था: आज जगभरामध्ये १४ फेब्रुवारी हा दिवस 'व्हेलेंटाईन डे' (Valentine day) म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मात्र, ३ वर्षांपासून हा दिवस देशाकरिता आणि भारताच्या (India) जवानाकरिता काळा दिवस ठरलेला होता. १४ फेब्रुवारी २०१९ या दिवशी जम्मू- काश्मीर (Jammu and Kashmir) मधील पुलवामा (Pulwama) येथे दहशतवाद्यांनी (terrorists) दहशतवादी हल्ला करून हा दिवस रक्तरंजित केला होता. पुलवामा हल्ल्याच्या (attack) जखमा अजून देखील ताज्या आहेत. पुलवामा जिल्ह्यामध्ये स्फोटकांनी (Explosive) भरलेल्या गाडीने सीआरपीएफच्या (CRPF) जवानांच्या बसला जोरात धडक दिली होती. (Today marks third anniversary Pulwama attack)

हे देखील पहा-

त्यामध्ये ४० जवान शहीद झाले होते. तर, अनेकजण गंभीर जखमी झाले होते. दहशवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहिद झाले होते. आज देशभरामध्ये या शहिदांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. शहिद झालेल्या ४० शहिदांमध्ये सीआरपीएफच्या ७६ व्या बटालियनच्या ५ जवानांचा यामध्ये समावेश होता. या भ्याड हल्ल्यामुळे संपूर्ण देशातून संतापजनक व्यक्त करण्यात आला होता. यानंतर काही दिवसांनी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक करुन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

Pulwama Attack: पुलावामा हल्ल्याला आज 3 वर्ष पूर्ण! भारताच्या इतिहासातील 14 फेब्रुवारी 2019 हा काळा दिवस
Ahmednagar: नदीपात्रातील वाळू उपशाच्या नवीन धोरणाला शेतकऱ्यांचा विरोध

एका मॅसेजमुळे ठका बेलकरांचे प्राण वाचले होते

पुलवामा येथे शहीद झालेल्या ४० जवानांच्या बसमध्ये महाराष्ट्रामधील अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील कॉन्स्टेबल ठका बेलकर यांचा देखील यामध्ये समावेश होता. हल्ल्याच्या अगोदर काही दिवस त्यांचे लग्न ठरले होते. कुटंबामधील मंडळी त्यांच्या लग्नाची तयारीमध्ये होते. बेलकर यांनी रजेकरिता अर्ज केला होता. परंतु, त्यांची रजा मंजूर झालेली नव्हती. यामुळे आपल्या सहकाऱ्यांबरोबर ते देखील या बसमधून निघाले होते.

परंतु, बस सुटण्याअगोदरच काही वेळ त्यांना मोबाईलवर रजा मंजूर झाल्याचा मेसेज आला आणि ते बसमधून खाली उतरले होते. यानंतर काही वेळातमध्येच या बसवर हल्ला झाला आहे. परंतु, काही वेळाअगोदर आलेल्या मेसेजमुळे बेलकर यांचे प्राण वाचले होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com