Samruddhi Mahamarg Accident Saam Tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; अतिवेगामुळे टायर फुटले, कार चार वेळा उलटली

या अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आहे.

डॉ. माधव सावरगावे

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावरील वेगामुळे टायर फुटून कारच्या चार कोलांट्या झाल्याची घटना औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील लासूर स्टेशन परिसरात घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणाचाही मृत्यू झाला नाही. ही थरारात घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास लासूर स्टेशन परिसरात घडली आहे. गाडी चार कोलांट्या घेत विरुद्ध दिशेच्या कडेला जाऊन गाडी आदळली. अपघातानंतर (Accident) राष्ट्रीय महामार्गाच्या कर्मचाऱ्यांनी जखमींना मदत केली. या अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आहे.

शिर्डी येथून एक कार नागपूरच्या दिशेने जात होती. या गाडीमध्ये दोन महिला, दोन पुरुष आणि दोन लहान मुले होती. हे सर्व जण समृद्धी महामार्गावरून नागपूरकडे जात होते. त्यांच्यासोबत आणखी एक गाडी होती. ती गाडी वेगात पुढे निघून गेल्यानंतर पाठीमागे पडलेल्या गाडीने दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. लासूर स्टेशनच्या पुढे निघाल्यानंतर पोटूळजवळ आल्यानंतर अतिवेगात असल्यामुळे गाडीचे चाक फुटले.

त्यामुळे गाडीने नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरून चार वेळा उलटली. या भीषण अपघातात सुदैवाने गंभीर इजा झाली नाही. या अपघातात सहा प्रवाशांना किरकोळ मार लागला. जखमींवर रुग्णवाहिकेतच उपचार करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांनीही घटनास्थळी पाहण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Bajpayee: मनोज बाजपेयी झाला मुळशीकर, पुण्यात खरेदी केली ५ एकर जमीन, तब्बल ‘इतक्या’ कोटीत

Maharashtra News Live Update: बाभुळगांव वरून आंदोलक विद्यार्थी अमरावतीसाठी रवाना

Shocking : "..तू पण माझ्यावर प्रेम कर" एकतर्फी प्रेमातून तरुणीने संपवले आयुष्य; सांगलीतील धक्कादायक घटना

8th Pay Commission: ₹18,000 वरून पगार थेट ₹72,000? 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, जाणून घ्या संपूर्ण गणित

Famous Actor : मृत्यूच्या दाढेतून परतला प्रसिद्ध अभिनेता! "काही तासांपूर्वी आम्ही तिथेच होतो..." सांगताना अंगावर आला काटा

SCROLL FOR NEXT