Kolhapur  Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur News : कोल्हापूर हादरलं! पार्टीदरम्यान झाला मोठा राडा; जुन्या वादातून तरुणाला धारदार शस्त्राने भोसकून संपवलं

Kolhapur crime News : कोल्हापुरात पार्टीदरम्यान मोठा राडा झाला. जुन्या वादातून एका तरुणाला संपवल्याची घटना घडली आहे. कोल्हापुरातील तरुणाला धारदार शस्त्राने वार करून संपवण्यात आलं आहे.

Vishal Gangurde

रणजीत माजगावकर, साम टीव्ही

सांगली जिल्ह्यातील इस्लामपुरात भरदिवसा गुंडाची हत्या झाल्याची घटना ताजी असताना कोल्हापुरातही खळबळजनक घटना घडली आहे. कोल्हापुरातील शिवाजी पेठेत तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. कोल्हापुरातील तरुणाच्या हत्येने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे.

कोल्हापुरातल्या शिवाजी पेठेत रंकाळ्याच्या समोर तरुणाची निघृण हत्या करण्यात आली आहे. प्रशांत कुंभार असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. नरेंद्र राजाराम साळुंखे याने खंजीरने कुंभारला भोसकल्याची माहिती समोर येत आहे. ही माहिती कुंभारच्या मित्राने पोलिसांना दिली.

नेमकं काय घडलं?

कोल्हापुरातील संध्यामठ गल्लीतील एका हॉलमध्ये रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पार्टी सुरु होती. कुंभार आणि साळुंखे यांच्या गेल्या काही वर्षांपासून वाद सुरु आहे. जुना वादच टोकाला गेला. मित्रांनी रक्तबंबाळ अवस्थेतच प्रशांत कुंभारला उपचारासाठी गाडीवरून नेलं. त्याचाही व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांत गु्न्हा नोंदवण्यात आला आहे. या हत्या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

सांगलीत भरदिवसा कुख्यात गुंडाची हत्या

सांगलीच्या इस्लामपुरात आज गुरुवारी एका तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत कुख्यात गुंड नितीन पालकरची भरदिवसा धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. गुन्हेगारी जगतात दबदबा असलेल्या नितीन पालकरची भरदुपारी हत्या झाली आहे. एका पान टपरीजवळ थांबलेला असताना गुंड नितीन पालकरची हत्या झालीये. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी आणि मारामारी सारखे अनेक गुन्हे दाखल होते. त्याच्यावर इस्लामपूर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाईही केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन

ईडीची सर्वात मोठी कारवाई; सुरेश रैना आणि शिखर धवनची कोट्यवधींची संपत्ती जप्त, क्रीडा विश्वात खळबळ

Crime: तरुणाने मैत्रिणीला संपवलं, मृतदेह पोत्यात भरून कृष्णा नदीत फेकला; सांगली हादरली

Maharashtra Politics: नाशिकमध्ये 'आघाडीला' भगदाड, तब्बल २०० निष्ठावंत पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

National cancer awareness day: भारतात सर्वाधिक वाढणारे ५ कॅन्सरचे प्रकार; शरीरात 'हे' बदल दिसल्यास लगेच जा डॉक्टरांकडे

SCROLL FOR NEXT