Solapur Firing news  Saam tv
महाराष्ट्र

Solapur Firing : राज्यात चाललंय काय? गाणी लावण्याच्या वादातून राडा; थेट कला केंद्रात गोळीबार

Solapur Firing news : सोलापुरात गाणी लावण्याच्या वादातून मोठा राडा झाला. सोलापुरातील टेंभुर्णीतील कला केंद्रात गोळीबाराची घटना घडली.

भारत नागणे

पुण्यात १९ वर्षीय आयुष कोमरकरची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना ताजी असताना आता सोलापुरातही गोळीबाराची घटना घडली आहे. सोलापुरातील टेंभुर्णी जवळच्या वेणेगावातील कला केंद्रासमोर गोळीबार झाला आहे. या गोळीबारात एकजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सोलापुरातील गोळीबाराने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरातील टेंभुर्णीतील कला केंद्रात गाणी लावण्याच्या वादातून वाद झाला. या वादाचं रुपांतर कडाक्याच्या भांडणात झाले. या वादातून एकाने गोळीबार केला. कला केंद्रातील या गोळीबारात एक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

जखमी झालेला व्यक्ती पंढपूरजवळील वाखरी गावचा रहिवाशी आहे. गोळीबाराची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर टेंभुर्णी पोलिसांनी आरोपीकडील पिस्तुल ताब्यात घेतलं. या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा नोंदवला आहे.

काय आहे प्रकरण?

कला केंद्रात एक बैठक लावण्यावरून वाद झाला. या बैठक लावण्यावरून प्रकरण थेट गोळीबारापर्यंत पोहोचलं. आरोपीने थेट पीडित व्यक्तीच्या डाव्या बाजूच्या मांडीवर गोळीबार केला. या गोळीबारात देवा नावाचा व्यक्ती जखमी झाला.

पोलिसांकडून आरोपीचं नाव उघडीकस आलेलं नाही. मात्र, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केलीये. सोलापुरातील या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Court : पतीपेक्षा पत्नीचं उत्पन्न जास्त असेल तर पोटगी नाही! मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

LPG Rate Today : एलपीजी सिलिंडरवर सरकार देतंय तब्बल ७०० रुपयांची सबसिडी? समोर आली मोठी माहिती

रोज तेल लावल्याने केस खरंच वाढतात का?

Maharashtra News Live Update: लोकसभेचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलंय

Satara Accident : फलटणजवळ कारचा भीषण अपघात; ३ कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू, ३ गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT