मंदिरं उघडली! पालकमंत्री अदिती तटकरे यांनी घेतले पाली बल्लाळेश्वरचे दर्शन राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

मंदिरं उघडली! पालकमंत्री अदिती तटकरे यांनी घेतले पाली बल्लाळेश्वरचे दर्शन

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पाली बल्लाळेश्वरचे दर्शन घेतले. जिल्ह्यात देव दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची पावले मंदिराकडे वळली आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर, रायगड

रायगड: देवाची दारं आजपासून भाविकांसाठी खुली झाली आहेत. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पाली बल्लाळेश्वरचे दर्शन घेतले. जिल्ह्यात देव दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची पावले मंदिराकडे वळली आहेत. (Temples opened! Guardian Minister Aditi Tatkare visited Pali Ballaleshwar)

हे देखील पहा -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे, प्रार्थना स्थळे बंद करण्यात आली होती. त्यामुळे दीड वर्षांपासून देवाचे दर्शन भाविकांना घेता आले नव्हते. कोरोना प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने शासनाने राज्यातील मंदिरे भाविकांसाठी दर्शनासाठी आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर ७ ऑक्टोबर पासून खुली केली आहेत. अष्टविनायकपैकी एक असलेले पाली बल्लाळेश्वर मंदिरही आज दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी सकाळी नऊ वाजता मंदिरात जाऊन बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले. राज्यावर आलेल्या कोरोना संकटाचे लवकरात लवकर अरिष्ट दूर होऊ दे अशी प्रार्थना अदिती तटकरे यांनी बल्लाळेश्वर चरणी केली आहे. कोरोनाच्या नियमाचे पालन करून भाविकांनी दर्शन घ्यावे असे आवाहनही पालकमंत्री यांनी केले आहे. पाली बल्लाळेश्वर देवस्थान प्रशासनाने कोरोनाच्या अनुषंगाने भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेतली आहे.

राज्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात असल्याने हळूहळू सर्व गोष्टी पुर्वपदावर येत आहेत. राज्यातील शाळा ४ ऑक्टोबर पासून सुरु झाल्या होत्या. आज ७ ऑक्टोबरपासून धार्मिक स्थळं खुली होत आहेत. तसेच २२ ऑक्टोबरपासून सिनेमागृहेसुद्धा खुली करण्यात येणार आहे. मात्र या सगळ्या ठिकाणी कोरोनोचे नियम पाळणे, मास्क वापरणे, फिजीकल डिस्टन्स ठेवणे हे बंधनकारक आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT