Heat Wave
Heat Wave Saam Tv
महाराष्ट्र

मे महिना विदर्भवासीयांसाठी अग्नीपरीक्षा; तापमान ४७ अंशापर्यंत जाणार!

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर: यावर्षीच्या मे महिना हा विदर्भातील नागरिकांसाठी अग्निपरीक्षा ठरु शकतो. कारण मे महिन्यात विदर्भातील तापमान ४७ अंशापर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढच्या पाच दिवसात तापमानात वाढ होण्याची शक्यता नागपूर (Nagpur) प्रादेशिक हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ भावना यांनी वर्तवला आहे.

मे महिन्यात तापमानात पुन्हा वाढ होणार आहे. पुढच्या पाच दिवसानंतर विदर्भात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे विदर्भातील नागरिकांनी काळजी घेण्याची आवाहन केले आहे. मागिक काही दिवसांपासून विदर्भातील उष्णतेची लाट (Heat wave) वाढतच आहे. या वर्षी उष्णता ५० अंशापर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

उष्णतेच्या झळांनी विदर्भीयांना पुरते हैराण केले आहे. विदर्भ मधील (Vidarbha) चार जिल्ह्यांमध्ये आजपासून तापमान असेच वाढत राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.यवतमाळ (Yawatmal), चंद्रपूर (Chandrapur), वर्धा (Wardha), अकोला (Akola) चार जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

एप्रिल महिन्यापासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. तर मे महिना हा विदर्भातील नागरिकांसाठी अग्निपरीक्षा ठरू शकतो. कारण मे महिन्यात विदर्भातील तापमान ४७ अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. यंदा एप्रिल महिन्यात विदर्भातील तापमान ४५ अंशाच्या पुढे गेले होते. मे महिन्यात विदर्भात सर्वाधिक तापमान राहणार आहे. त्यामुळे यावर्षी मे महिन्यात सूर्य चांगलाच तळपणार असे संकेत आहेत. मे महिन्यात साधारणत ७-८ तारखेनंतर रेड अलर्ट असू शकतो, असा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ भावना यांनी व्यक्त केला आहे.

केंद्राने सर्व राज्यांना दिला 'हा' इशारा

वाढते तापमान आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा या पार्श्वभूमीवर केंद्राचा 'ताप' वाढला आहे. खबरदारी म्हणून केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्राद्वारे सतर्कतेचा इशारा दिला आहे. देशभरातील वाढते तापमान आणि उष्णतेची लाट यामुळे आजार वाढण्याची भीती असून, सर्व जिल्ह्यांनी राष्ट्रीय कार्य योजनेंतर्गत मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्याच्या सूचना केल्या आहेत.

देशभरात वाढते तापमान आणि उष्णतेच्या लाटेचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सावधानता बाळगण्याच्या सूचना केल्या आहेत. आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक औषधे आणि ती किती प्रमाणात उपलब्ध आहेत, याबाबतचा आढावा घेण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर संवेदनशील क्षेत्रांमध्ये पुरेसे पिण्याचे पाणी पुरवण्यात येईल, हे सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना शनिवारी पत्र लिहिले आहे. सर्व जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेमुळे संभाव्य साथरोगांवर राष्ट्रीय कार्य योजनेसंबंधी मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण माघार घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल

Delhi News: दिल्लीत १५ टन बनावट मसाले जप्त; भेसळीत ॲसिड अन् लाकडी भुशाचा समावेश

Kangana Ranaut : लोकसभा निवडणुकीत बाजी मारल्यास काय करणार? कंगना रणौतने सांगितला पुढील प्लान

बुलढाणा : 'डीजे' बंदीनंतर मंगल कार्यालय, लाॅन्ससाठी पाेलिसांची नियमावली; जाणून घ्या सूचना

Premachi Goshta Serial : 'प्रेमाची गोष्ट' मध्या नवा ट्विस्ट; मिहिका मिहीच्या नात्यामध्ये सावनीची सावली?

SCROLL FOR NEXT