Tejaswini Ghosalkar joins BJP ahead of Mumbai BMC elections Saam Tv
महाराष्ट्र

महापालिका निवडणुकीआधी राजकीय भूकंप, मुंबईत ठाकरेसेनेला आणखी एक खिंडार

Political Earthquake in Mumbai: ठाकरेसेनेला पुन्हा एकदा खिंडार पडलयं... मुंबई महापालिकेच्या तोंडावर ठाकरेसेनेच्या माजी नगरसेविकेनं थेट भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय... मात्र माजी नगसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरेसेनेला सोडचिठ्ठी का दिली? या पक्षप्रवेशानं घोसाळकर कुटुंबात नव्यानं राजकीय संघर्षाला सुरुवात कशी झालीय?

Suprim Maskar

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेसेनेला मोठा धक्का बसलाय... ठाकरेसेनेतील माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपात प्रवेश केलाय... तर भाजप प्रवेशानंतर लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा दावा विधान तेजस्वी घोसाळकरांनी केलाय.. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी तेजस्वी घोसाळकरांचा पक्षप्रवेश महत्त्वाचा असल्याचं मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी सांगितलं...

तेजस्वी घोसाळकर यांच्या पक्षप्रवेशानं ठाकरेसेनेला धक्का का बसलाय... तेजस्वी घोसाळकरांची राजकीय कारकीर्द कशी राहिलीय...

कोण आहेत तेजस्वी घोसाळकर?

तेजस्वी घोसाळकर शिवसेनेच्या माजी नगरसेविका

2017 साली तेजस्वी मुंबई महापालिकेवर निवडून गेल्या

तेजस्वी यांचे पती अभिषेक घोसाळकर ही ठाकरेसेनेचे माजी नगरसेवक

सासरे विनोदी घोसाळकर हे ठाकरेसेनेचे माजी आमदार

अभिषेक यांच्या हत्येनंतर तेजस्वी घोसाळकर चर्चेत आल्या

पतीच्या हत्येनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेजस्वी घोसाळकर ठाकरे गटाकडून इच्छूक होत्या. मात्र त्यांच्याऐवजी ठाकरेसेनेनं सासरे विनोद घोसाळकर यांना तिकीट दिलं आणि तेव्हापासूनच त्या नाराज असल्याचं बोललं जात होतं. त्य़ानंतर त्यांना भाजपनं मुंबै बँकेवर संचालकपदी नियुक्त केलं. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी अधिकच जोर धरला.

मात्र त्यानंतर तेजस्वी यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन चर्चा केली. त्यामुळे पुन्हा संभ्रमाचं वातावरण तयार झालं. मात्र अखेर भाजपनं लावलेला गळ यशस्वी ठरला. आणि तेजस्वी घोसाळकरांना ठाकरेसेनेतून तोडण्यात भाजपला यश आलं. यामुळे खडसेंप्रमाणे आता घोसाळकर कुटुंबातही सासरे आणि सुनेत राजकीय संघर्षाची चिन्ह आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा नवा फॉम्युला, इच्छुकांची भाऊगर्दी, मतदारांच्या दारोदारी

SCROLL FOR NEXT