Teachers Salary Hike Scam  google
महाराष्ट्र

Teachers Salary Scam: शिक्षकांची पगारवाढ बोगस; बनावट अध्यादेशाद्वारे 17 लाखांची फसवणूक

Teachers Salary Hike Scam : पगारवाढीसाठी चक्क बनावट जीआर काढण्यात आल्याची धक्कादायक बाब उघड झालीय. थेट शिक्षकांच्या पगावाढीचा घोटाळा अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तेजस नागरे, साम प्रतिनिधी

तुम्ही शिक्षक भरती घोटाळा ऐकला असेल. मात्र थेट शिक्षकांच्या पगावाढीचा घोटाळा कधी ऐकलाय का? नाही ना? तोच आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. बनावट जीआर काढून शिक्षकांचे पगार कसे वाढवण्यात आले आणि शिक्षकांनाही कसा चुना लावण्यात आला? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

पगारवाढ हा सर्वच कर्मचाऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय. मात्र य़ाच पगारवाढीमुळे राज्यात अनेक शिक्षकांची फसवणूक झाल्याच्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. विशेष म्हणजे या पगारवाढीसाठी चक्क बनावट जीआर काढण्यात आल्याची धक्कादायक बाब उघड झालीय. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शाळांमधील कला शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ मिळवून देण्यासाठी हा कारनामा करण्यात आला.

आरोपी डॉ. दीपक चांदणेनं अशा ५० शिक्षकांना तब्बल १७ लाख रूपयांना गंडवलं. मात्र शिक्षण अधिकाऱ्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर दीपक चांदणेचं बिंग फुटलं. हा फसवणुकीचा प्रकार नेमका कसा उघ़ड झाला ते पाहूयात

शिक्षकांची पगारवढ बोगस

19 ऑक्टोबर 2024 ते 27 डिसेंबर 2024 दरम्यान घडला प्रकार

‘एएम’ ही पदवी मिळवल्यानंतरच वरिष्ठ वेतनश्रेणी

मात्र दीपक चांदणेनं ‘एटीडी’ पदविका कला शिक्षकांना गाठलं

शिक्षण विभागातील ओळखीतून लाभ मिळवून देण्याचं चांदणेचं आमिष

लाभाच्या बदल्यात ५० शिक्षकांकडून उकळले १७ लाख रुपये

डिजिटल स्वाक्षरी वापरून काढला बनावट जीआर

मात्र बनावट शासन निर्णय समाज माध्यमात व्हायरल

शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकरांच्या निदर्शनास ही बाब आली

दीपक चांदणेच्या बनावट अध्यादेशाचा पर्दाफाश

याबाबत शिक्षण आयुक्तांनी एक समिती स्थापन केली असून समितीचा अहवाल एसीबीला दिलाय. आणि त्यानुसार चौकशी सुरुये. दरम्यान या प्रकरणात अजूनही काही लोकांचा समावेश असण्याची शक्यता आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला पगारवाढीची अपेक्षा असते...या पगारवाढीसाठी सगळेच जण आपापल्या परिने प्रयत्न करतात.शैक्षणिक पात्रता नसतानाही पगारवाढीच्या लोभामुळेच या शिक्षकांची फसवणूक झाली. आणि त्यांच्या या लोभीपणामुळेच दीपक चांदणेसाऱख्यांचं उखळ पांढरं होतं हेही तेवढंच खरं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT