Nagpur Board: ६ महिन्यांपूर्वी शिक्षकाचा मृत्यू; बोर्डाने दिली परीक्षेची जबाबदारी, नागपूर बोर्डाचा भोंगळ कारभार उघड

Nagpur Board Blunder Dead: एका शिक्षकाचा मृत्यू होऊन सहा महिने उलटले. तरी देखील बोर्डानं अद्याप त्यांच्या मृत्यूची नोंद केलेली नाही. उलट मृत शिक्षकावरच परीक्षेची जबाबदारी दिली आहे.
Nagpur Board
Nagpur BoardNagpur Board
Published On

नागपूर बोर्डाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. एका शिक्षकाचा मृत्यू होऊन सहा महिने उलटले. तरी देखील बोर्डानं अद्याप त्यांच्या मृत्यूची नोंद केलेली नाही. उलट मृत शिक्षकावरच परीक्षेची जबाबदारी दिली आहे. नागपूर बोर्डाने प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासाठी एक नव्हे तर तब्बल दोन शाळेत बहिर्गत परीक्षक म्हणून नियुक्ती आदेश दिले आहे. त्यामुळे बोर्डाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

सहा महिन्यांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालेल्या शिक्षकाच्या नावानं नागपूर बोर्डाने प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासाठी एक नव्हे तर तब्बल दोन शाळेत बहिर्गत परीक्षक म्हणून नियुक्ती आदेश दिले आहेत. संबंधित शिक्षक हयात नसल्याची माहिती संबंधित शाळेने बोर्डाला कळविल्यानंतरही बोर्डाने मृत शिक्षकाच्या नावाने आदेश काढले आहेत. त्यामुळे बोर्डाच्या अजब कारभाराची सर्वत्र चर्चा होत आहे.

Nagpur Board
Mutual Funds: म्युच्युअल फंडाची प्रक्रिया झाली सोपी, आता डेबिट कार्डनं देखील गुंतवणूक करता येणार

दरवर्षी बोर्डाच्या लेखी परीक्षेपूर्वी प्रत्येक शाळेत विज्ञान विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाते. इतर शाळेतील विज्ञान शिक्षकाला बहिर्गत परीक्षक म्हणून कोणत्याही शाळेत पाठविले जाते. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथील जानकीबाई विद्यालयातील शिक्षक मिलिंद पंचभाई यांचा २ ऑगस्ट २०२४ रोजी ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता. याला ६ महिने उलटले.

Nagpur Board
Crime News: वडिलांच्या मित्राचं सैतानी कृत्य! लैंगिक अत्याचारानंतर चिमुकलीची गळा आवळून हत्या

तरी देखील दहावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासाठी मृतक शिक्षक मिलिंद पंचभाई यांना तिरखेडी आणि बिजेपार या दोन्ही शाळेत बहिर्गत परीक्षक म्हणून जाऊन प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचे आदेश पाठवण्यात आले आहे. हे आदेश प्राप्त होताच शाळेला सुद्धा प्रश्न पडला असून, बोर्डाच्या अजब कारभाराचा नमुना समोर आला आहे. आता तरी नागपूर बोर्ड या गोष्टीकडे गांभीर्याने दखल घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com