teacher Saam Digital
महाराष्ट्र

Fake Teacher Scam : शिक्षण विभागाला हादरवणारी बातमी; नागपुरात निघाले 570 शिक्षक बोगस, झाला इतक्या कोटींचा घोटाळा? पाहा व्हिडिओ

Fake Teacher Scam in Marathi : राज्यात पुन्हा एकदा शिक्षक भरती घोटाळा उघड झालाय... हा घोटाळा 200 कोटींपेक्षा मोठा असल्याचं म्हटलं जातंय... मात्र हा घोटाळा कसा केला? यामध्ये किती शिक्षक बोगस आहेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Bharat Mohalkar

शिक्षक म्हणजे समाजाचा कणा.... विद्यार्थ्यांना घडवणारा गुरु... पण याच उपाधींना काळीमा फासणारा प्रकार नागपूरमध्ये घडलाय... नागपूरमध्ये पराग नानाची पुंडकेने कुठलाच अनुभव नसताना शिक्षण विभागाच्या संगनमताने थेट मुख्याध्यापक पद पटकावल्याचं उघड झालं आणि एकच खळबळ उडाली. मात्र हा घोटाळा कसा केला? पाहूयात....

राज्यात शिक्षक घोटाळा?

बोगस कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापकपदास मंजुरी

शिक्षक पदाचा अनुभव नसताना मिळवलं थेट मुख्याध्यापकपद

नागपुरातील शाळेत शिक्षक असल्याची बोगस कागदपत्रं बनवले

आर्थिक व्यवहारातून भंडाऱ्यात मुख्यध्यापकपदी नियुक्ती

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकारी, वेतन पथक अधीक्षकांचा घोटाळ्यात सहभाग

हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलीसांनी पुंडके आणि शिक्षण उपसंचालक उल्हास नरडच्या मुसक्या आवळल्यात...

हे प्रकरण फक्त पराग पुंडकेपुरतंच मर्यादित नाही... तर या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे.... नागपूरात तब्बल 570 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बोगस असल्याचं मंत्रालयातील अहवालातून उघड झालंय...तर या प्रकरणात 100 ते 200 कोटींचा आर्थिक व्यवहार झाल्याचं म्हटलं जातंय.

त्यामुळे या प्रकरणाची एसआयटी चौकशी कऱण्याची मागणी ना.गो. गाणार यांनी केलीय...

शिक्षक भरतीत 200 कोटींचा घोटाळा?

याआधी टीईटी परीक्षेत असाच शिक्षक भरती घोटाळा उघड झाला होता.. मात्र आता थेट शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त आणि शिक्षण उपसंचालक यांना घोटाळ्याची कल्पना असतानाही त्यांनी पराग पुंडकेला अभय का दिलं? या घोटाळ्याची व्याप्ती फक्त नागपूरपुरती आहे की याची पाळंमुळे महाराष्ट्रभर पसरले आहेत? त्याचाही षोध घेण्याची गरज आहे... मात्र सरकार या प्रकरणाची सखोल चौकशी करुन सत्य बाहेर आणणार की हे प्रकरण दडपलं जाणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rukmini Vasanth: 'कांतारा' चित्रपटात आपल्या दमदार अभियनाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री कोण?

Laughing Benefits: हसल्याने आरोग्याला कोणकोणते फायदे होतात माहितीये का?

Maharashtra Politics : शरद पवारांना धक्का, विश्वासू सहकाऱ्यांने केला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुंग्या किती वेळ झोपतात माहितीये का? वेळ ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

Maharashtra Live News Update: कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये राडा! पुण्यात दोन गटात तुफान हाणामारी

SCROLL FOR NEXT