Pandharpur News  SAAM TV
महाराष्ट्र

Pandharpur News : 'तो' शिक्षक एकही दिवस शाळेत आला नाही, मुख्याध्यापकानं हडपला ३.५ लाख पगार

Pandharpur News : शाळेत एकही दिवस न आलेल्या शिक्षकाचे साडेतीन लाख रुपयांचे वेतन मुख्याध्यापकानेच हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

भारत नागणे, पंढरपूर

Pandharpur News : खासगी विनाअनुदानित शाळेत एकही दिवस न आलेल्या शिक्षकाचे साडेतीन लाख रुपयांचे वेतन बनावट स्वाक्षऱ्या करून मुख्याध्यापकानेच हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी माढा तालुक्यातील आलेगाव (खु) येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब केचे याच्यावर टेंभुर्णी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या २५ मार्च २०२१ रोजीच्या आदेशानुसार नोव्हेंबर २०२० पासून सरस्वती विद्यालयाच्या पाचवी ते सातवीपर्यंतच्या वर्गाला २० टक्के अनुदान मिळाले. त्यानंतर सागर नवगण यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून हजेरीपत्रक बनवून वेतनदेयक तयार करण्यात आले.

नोव्हेंबर २०२० ते डिसेंबर २०२२ या काळातील तीन लाख ५८ हजार ६२३ रुपयांचे वेतन शालार्थ प्रणालीद्वारे काढले. नवगण यांचे जिल्हा बँकेच्या भीमानगर शाखेत खाते नसल्याने त्यांचे वेतन शाळेच्या खात्यात जमा झाले. त्या खात्यातून साडेसात लाख रुपये काढून दादासाहेब केचे पतसंस्थेत वर्ग केले.

जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब केचे यांनी सागर नवगण यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांचा गैरवापर केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले.

त्यामुळे संबंधित मुख्याध्यापकावर सरकारची फसवणूक करून रकमेचा अपहार केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : मंगळवार शुभ ठरणार की आव्हानात्मक? आजच वाचा राशीभविष्य

Toilet Scrolling : टॉयलेटमध्ये फोन वापरताय? गंभीर आजाराचा करावा लागेल सामना, अभ्यासात मोठा खुलासा

Nangartas Waterfall : शहराच्या गजबजाटापासून दूर वसलाय नांगरतास धबधबा, पाहता क्षणी ताणतणावातून व्हाल Relax

Maharashtra Live News Update: नजर ठेवण्यासाठी पोलीसांकडून अत्याधूनिक ड्रोनचा वापर

Eye Care: डोळ्यांसाठी सर्वात महत्वाचे आहेत 'हे' व्हिटामिन, ९९% लोकांना माहिती नसेल

SCROLL FOR NEXT