govind linge teacher passed away in a road accident at parbhani pathri national highway saam tv
महाराष्ट्र

Parbhani Accident News : विद्यार्थी प्रिय शिक्षकाचा अपघाती मृत्यू, ग्रामस्थ गहिवरले

त्यांच्या अपघाती निधनाने गावात शाेककळा पसरली.

राजेश काटकर

Parbhani News :

परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील कोथाळा शाळेवर कार्यरत असलेले गोविंद लिंगे या शिक्षकाचा (teacher) अपघाती मृत्यू झाला. संयमी व शांत स्वभावाचे विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून गोविंद लिंगे हे कोल्हा परिसरात परिचित होते. त्यांच्या अपघाती निधनाने गावात शाेककळा पसरली. (Maharashtra News)

याबाबत मिळालेली माहिती अशी - गोविंद लिंगे हे कार्यालयीन कामासाठी परभणी येथे गेले होते. तेथील काम संपल्यावर ते दुचाकीवरुन मानवतला परत येत हाेते. परभणी पाथरी राष्ट्रीय महामार्ग 61 रोडवर असलेल्या एका फार्म हाऊस समोर त्यांचा अपघात झाला.

या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. लिंगे यांच्या मृत्यूची बातमी गावात धडकताच ग्रामस्थांसह विद्यार्थी गहिवरले. या अपघाताचा तपास पाेलिस करीत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ट्रॅक्टर- दुचाकी धडकेत एक ठार, एक गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर कोपरगाव मार्गावर झालेल्या ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीस पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोपरगाव तालुक्यातील मंडपाचे काम करुन हे दोघेही घराकडे निघाले होते. मात्र त्यांच्यावर मध्येच काळाने घाला घातला. या घटनेमुळे वैजापूर तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

SCROLL FOR NEXT