Teacher Job 
महाराष्ट्र

Teacher Job: पालघर जिल्हा परिषदेत 1891 जागांसाठी शिक्षक भरती; येथे करा अर्ज

Bharat Jadhav

शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पालघर जिल्ह्यात तब्बल 1891 पदांसाठी शिक्षक भरती होणार आहे. जिल्हा परिषदेत शिक्षक पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य इतर प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवारांमधून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात (ZP Palghar Bharti) कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत असून अर्जाची शेवटची मुदत २३/०८/२०२४ पर्यंत आहे.

1891 जागांसाठी भरती

प्राथमिक शिक्षक (कंत्राटी)

पदवीधर प्राथमिक शिक्षक (कंत्राटी)

1891 जागांसाठी भरती

पद क्र.1: HSC, D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH, TET / CTET पेपर 1

पद क्र.2: D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH किंवा B.Ed./B.A.Ed./B.Sc.Ed., TET/CTET पेपर 2 -TAIT

वयाची पात्रता- वयोमर्यादा नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 ऑगस्ट 2024

कुठे पाठवणार अर्ज

अर्ज पाठविण्याचा पत्ता: शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. पालघर नवीन जिल्हा परिषद इमारत, दालन क्र. 17,कोळगाव, पालघर, बोईसर रोड, पालघर (प.)

राज्यात लवकरच ५० हजार शिक्षक भरती होणार

राज्यात लवकरच ५० हजार शिक्षकांची भरती केली जाणार, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी काही दिवसापूर्वी केली होती. पहिला टप्प्यात ३० हजार आणि दुसऱ्या भरतीत २० हजार शिक्षकांची पदे भरली जाणार आहे. ही शिक्षकभरती दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती देखील मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यात ३० हजार शिक्षकांची भरती होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात राज्यात २० हजार शिक्षकांची भरती होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली होती.

राज्यात शिंदे-फडणवीसांचं सरकार आल्यानंतर शिक्षण विभागाकडून शिक्षक भरतीच्या अनेक घोषणा करण्यात आल्या होत्या. नवीन शैक्षणिक वर्षात शिक्षक भरती करण्यात येईल असं देखील मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT