railway track canva
महाराष्ट्र

Parbhani Accident: राज्याला हादरवणारी घटना! शिक्षक पती, पत्नी अन् मुलीने रेल्वेखाली झोकून संपवलं जीवन

Parbhani Family Accident News: परभणीत शिक्षक कुटुंबातील ३ लोकांनी रेल्वेसमोर येऊन आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे.

Ankush Dhavre

परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये आज (२८ नोव्हेंबर) धक्कादायक घटना घडली आहे. या शहरातील शिक्षक असलेल्या आई, वडील व मुलगी अशा तिघांनी रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

ही घटना दुपारच्या वेळी घडली. या धक्कादायक घटनेमुळे गोदा काठ थरारला असुन आत्महत्येचे कारण अजूनही कळू शकलेले नाही.

गंगाखेड शहरातील ममता कन्या माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षकाने पत्नी व मुलीसह गंगाखेड रेल्वे स्टेशनपासून परभणीकडे जवळच जाणाऱ्या लोहमार्गावर गोदावरी नदी पुलाच्या पुढे रेल्वे रुळावर डोकं ठेवून झोपत कोळसा वाहतूक करणाऱ्या माल वाहतूक रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

या घटनेमुळे संपूर्ण गोदाकाठ थरारला असून माल वाहतूक रेल्वेसमोर रेल्वे रुळावर डोकं ठेवून आत्महत्या केल्याच्या वृत्ताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

या घटनेत मयत झालेल्या शिक्षकाचे नाव मसनाजी सुभाष तुडमे (वय ४५ वर्ष), त्यांची पत्नी रंजना मसनाजी तुडमे (वय ४० वर्ष) व मुलगी अंजली मसनाजी तुडमे (वय २१ वर्ष) असं आहे.

विशेष म्हणजे एकाच कुटुंबातील पती, पत्नी व मुलगी या तिघांनी एका विचाराने एकाच रेल्वे रुळावर डोकं ठेवून आजुबाजूला एका रांगेत झोपून आत्महत्या केल्याच्या घटनेने या कुटुंबावर असे कोणते संकट कोसळले होते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या ₹२००० खटाखट जमा होणार; तुम्हाला मिळणार की नाही? वाचा सविस्तर

Rent Agreement : नवा कायदा, डिपॉझिट जास्त घेततल्यावर घर मालकावर कारवाई होणार, वाचा नेमकं सत्य काय?

Health Care : उचकी थांबत नाहीये? मग करा हे सोपे घरगुती उपाय

Maharashtra Live News Update : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला

Office Hairstyles: मेसी वेणी आणि बबल पोनीटेल, ऑफिस आणि कॉलेजसाठी 5 मिनिटांत होतील अश्या झटपट 5 हेअरस्टाईल्स

SCROLL FOR NEXT