jalna Crime Saam Tv
महाराष्ट्र

Jalna News : हॉटेल बंद न केल्याने तरुणांची सटकली, मालकाला लाठाकाठ्यांनी बेदम मारहाण, VIDEO

Jalna News : जालना येथे हॉटेल बंद करण्यावरून चहा विक्रेत्याला काही जणांनी अमानुष मारहाण केली. या घटनेत विक्रेता गंभीर जखमी झाला असून पोलीस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

जालनात चहा विक्रेत्यावर पाच ते सहा जणांनी लाठ्या-काठ्यांनी अमानुष मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना काल रात्री उशिरा घडली असून हॉटेल बंद करण्यावरून वाद उफाळल्याचे समोर आले आहे. या घटनेत चहा विक्रेते रामेश्वर घुंगरड गंभीर जखमी झाले असून हल्लेखोरांविरोधात त्यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

जालना शहराजवळील नागेवाडी शिवारात रात्रीच्या सुमारास रामेश्वर घुंगरड यांचे हॉटेल सुरु असताना ते बंद करण्यासाठी काही तरुणांनी त्यांच्याजवळ आग्रह केला. दरम्यान रामेश्वर यांनी हॉटेल बंद करण्यास नकार दिल्याने काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर काठीने हल्ला केला. या मारहाणीत रामेश्वर घुंगरड गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या जालना शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सदर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे.

या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात सहा अज्ञात आरोपींविरोधात गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत असून लवकरच त्यांना अटक केली जाईल, असा विश्वास पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे. या घटनेने पुन्हा एकदा स्थानिक गुंडगिरी आणि कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चहा विक्रेत्याची प्रकृती सध्या गंभीर असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Revised ITR: रिवाइज्ड आयटीआर म्हणजे काय? कोणाला भरता येतो? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: 7 दिवसांचा शिधा जमा करून मुंबईत आंदोलन करू, बच्चू कडू आक्रमक

iPhone 16 Pro: आयफोन १६ प्रोच्या किंमतीत मोठी सूट; यूजर्ससाठी सुवर्णसंधी, आताच खरेदी करा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, कोकण - घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट; इतर ठिकाणी काय परिस्थिती?

SCROLL FOR NEXT