Sangli, Sangli Crime News, Youth, tasgoan Saam tv
महाराष्ट्र

Tasgoan News : मणेराजूरीतील युवकाच्या खूनप्रकरणी तिघे अटकेत

या प्रकरणातील आणखी एका संशयिताचा शाेध सुरु असल्याची माहिती तासगाव पाेलिसांनी दिली.

विजय पाटील

सांगली : सांगली (sangli) जिल्ह्यातील तासगाव (tasgoan) तालुक्यातील मणेराजूरीत साहेबराव शिंदे गणेश (वय ३७) या युवकाचा (youth) किरकोळ कारणाने कुर्‍हाड व चाकूच्या धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. याप्रकरणी तासगाव पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या प्रकरणातील आणखी एका संशयिताचा शाेध सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (sangli crime news)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार मणेराजुरी येथील एका चौकात साहेबराव शिंदे गणेश आणि लखन कांबळे या दोघांत शुक्रवारी सायंकाळी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. दोघांनीही एकमेकांना बघून घेतो असा दम भरला हाेता. याच कारणावरून शनिवारी मणेराजुरी गव्हाण रस्त्यावर समाज मंदिराजवळ रात्री साडेआठच्या सुमारास रोहन उर्फ रुपेश अनिल माने तसेच गुंड्या उर्फ दादासाहेब कांबळे, बापूसाहेब उर्फ बाजीराव चव्हाण आणि लखन कांबळे या चौघांनी साहेबराव शिंदे गणेश याच्याशी मारामारी केली.

त्यानंतर त्यांनी कुऱ्हाड चाकू, कोयता या शस्त्राने त्याच्या वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेतील एकाचा शाेध सुरु असल्याची माहिती तासगाव पोलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT