sangli crime news Saam Tv
महाराष्ट्र

Sangli Crime News : तासगाव तालुक्यातील चाेरी अवघ्या काही तासांत उघडकीस, एकास अटक

पाेलिसांच्या नजरेतून संशयित आरोपी सुटला नाही.

विजय पाटील

Sangli Crime News : सांगली (sangli) जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील मांजर्डे येथील बंद घर फोडून झालेल्या चोरीचा छडा तासगाव पोलीसांनी अवघ्या काही तासातच लावला. (Maharashtra News)

या प्रकरणी मांजर्डे येथील एकास अटक (arrest) करण्यात आली आहे. त्याच्याकडून ३ लाख ७० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे अशीा महिती पोलीस निरीक्षक भानुदास निंबोरे यांनी दिली.

मांजर्डे गावात फिर्यादी अरूण भिमराव मोहिते यांचे अरुण एम्पोरियम हे दुकान आहे. या दुकानाचे उदघाटन असल्याने माेहित व त्यांच्या पत्नी घराला कुलूप लावून दुकानात गेले होते. कार्यक्रम झाल्यानंतर रात्री ते घरी परतले.

त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप व कडी कोयंडा तुटल्याचे दिसून आले. तसेच घरातील बेडरूममध्ये असलेली तिजोरीचा दरवाजा उघडा दिसला. त्यातील पितळी डब्यातील सोन्याचे दागिने व घरातील तांब्या पितळेची भांडी असा एकूण ४ लाख ६५ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेला.

अरुण माेहिते यांनी तातडीने पाेलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. पाेलिसांच्या नजरेतून संशयित आरोपी सुटला नाही. संशियताने अधिक चाैकशी करुन त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला. संबंधित संशियत आराेपीस अटक केल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परतीच्‍या पावसाचा अलिबागमध्ये प्रवासी आणि पर्यटकांना फटका

Nora Fatehi Photos: नोरा आली अन् वातावरण बदललं, फोटोशूट पाहून चाहते घायाळ

दिवाळीनंतर सर्वसामान्यांची 'चांदी'; दरात ३५ हजारांची घसरण, सोन्याच्या भावातही घट होणार?

ICC Women's World Cup 2025: वर्ल्डकप सेमीफायनलचा थरार रंगणार, भारत-ऑस्ट्रेलिया पुन्हा भिडणार, कधी होणार सामना?

Kalyan Dombivli Crime : दादा, भाईंची आता खैर नाही! नाशिकनंतर कल्याण डोंबिवलीत पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

SCROLL FOR NEXT