Zilla Parishad School Teacher, Baramati News saam tv
महाराष्ट्र

Zilla Parishad School : दारुच्या नशेत वर्गातच शिक्षक झिंगला, व्हिडिओ पाहताच शिक्षणाधिका-यांनी घेतली गंभीर दखल

Baramati Zilla Parishad School News : संबंधित शिक्षकाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आलेली आहे.

मंगेश कचरे

Baramati News : बारामती तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक शिक्षक चक्क दारू पिऊन झोपला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सजग नागरिकाने अचानक शाळाभेट केल्याने हा प्रकार समोर आला. (Maharashtra News)

ही घटना बारामती (Baramati) तालुक्यातील तरडोली येथील भोईटे वस्ती येथील शाळेतील आहे. याबाबतचा व्हिडिओ बनविला गेल्याने बारामती तालुका गटशिक्षणाधिकारी यांनी चौकशी समिती नेमली असून कडक कारवाईचे संकेत दिले आहेत.

ही घटना भोईटेवाडी जिल्हा परिषद शाळेत घडली आहे. या शाळेत 25 विद्यार्थी शिकत आहेत. या शिक्षकाबाबत गेल्या वर्षी देखील तक्रारी हाेत्या. वर्षभर ग्रामस्थांनी त्यांना सुधारण्याची संधी दिली. मात्र शिक्षकास त्याचे साेने करता आले नाही.

चिमुरड्या विद्यार्थ्यांना बेधुंद गुरुजी शाळेत पहावयास मिळाले. वर्गातच शिक्षक खुर्चीत बसून टेबलावर डोके ठेवून झोपी गेले होते. भरपूर दारू प्यायल्याने ते तर शुद्धीत नाही हे नागरिकांच्या लक्षात आले.

त्या व्यक्तीने संबंधित घटनेचा व्हिडिओ केला. साम टीव्हीशी बाेलताना संबंधित नागरिक म्हणाले या प्रकाराची तक्रार वरिष्ठांकडे केली आहे. त्यावरून संबंधित शिक्षकाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आलेली आहे.

या शिक्षकाची वैद्यकीय तपासणी होईल जे तपासणीत येईल त्यावर कडक कारवाई होईल असे शिक्षणाधिकारी गावडे यांनी देखील साम टीव्हीशी बाेलताना सांगितले. तसेच मुख्याध्यापकांना देखील नोटीस बजावली असल्याचे गावडे यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramesh Mhatre : डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सुप्रीम कोर्टाचा दणका, ५ ऑक्टोबरआधी सरेंडरचा आदेश

Maharashtra News Live Update: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ

कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवले तर चालान लागते का? काय आहे नियम

Weight Loss : धावणे की सायकल चालवणे; वजन झटपट कमी करण्यासाठी काय फायदेशीर? १५ दिवसांत फरक दिसेल

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

SCROLL FOR NEXT