लाच घेताना तलाठी सापडला - विजय पाटील
महाराष्ट्र

लाच घेताना तलाठी सापडला; अप्पर तहसिलदार मात्र झाला फरारी

सांगलीच्या जत तालुक्यातील संख येथील अप्पर तहसिलदार हणमंत म्हेत्रे यांच्या सांगण्यावरून दोन लाख 30 हजारांची लाच स्वीकारताना माडग्याळचे तलाटी विशाल विष्णू उदगिरे याला सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे

विजय पाटील

सांगली : माती वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई न करणे व सोडण्यासाठी सांगलीच्या Sangli जत तालुक्यातील संख येथील अप्पर तहसिलदार हणमंत म्हेत्रे यांच्या सांगण्यावरून दोन लाख 30 हजारांची लाच Bribe स्वीकारताना माडग्याळचे तलाटी विशाल विष्णू उदगिरे याला सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या Anti Corruption Bureau पथकाने रंगेहाथ पकडले आहे. Talathi Arrested In Sangli for Taking Bribe

काल रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. मात्र, या घटनेनंतर अप्पर तहसिलदार म्हेत्रे हे फरार झाले आहेत. मंगळवारी रात्री उशिरा उमदी पोलिस ठाण्यात अप्पर तहसिलदार व तलाटी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. गेल्या वीस दिवसांपूर्वी तक्रारदार हे शेतात माती वाहतूक करत असताना अप्पर तहसिलदार हणमंत म्हेत्रे व तलाटी विशाल उदगिरे यांनी वाहनावर कारवाईच्या अनुषंगाने संख अप्पर तहसिलदार कार्यालयात वाहने लावली होती. या वाहनावर कारवाई टाळण्यासाठी व सोडण्यासाठी दोघांनी ही तक्रारदारकडे दोन लाख 50 हजारांची मागणी केली होती.

यानंतर तक्रारदाराने दि. 5 जून रोजी सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी केलेल्या चौकशीीत दि. 9 ते 22 जून काळात संखचे अप्पर तहसिलदार हणमंत म्हेत्रे व तलाटी विशाल उदगिरे यांनी तक्रारदाराकडे पैसे मागितल्याचे निष्पन्न झाले. यानंतर लाचलुचपतच्या अधिकार्‍यांनी काल  संख अप्पर तहसिलदार कार्यालयात सापळा रचला.

यामध्ये अप्पर तहसिलदार म्हेत्रे यांच्या सांगण्यावरून तलाटी विशाल उदगिरे यांनी तक्रारदाराकडून दोन लाख 30 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. तलाठी उदगिरे याला सांगलीच्या पथकाने अटक करून त्याच्याकडे चौकशी सुरू केली आहे. मात्र, अप्पर तहसिलदार हणमंत म्हेत्रे यांनी घटना समजताच कार्यालयातून पळ काढला. या दोघांवर उमदी पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विधान परिषद निवडणुकीसाठी थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार

Kitchen Tips : डोसा तव्याला चिकटतोय? कांदा आणि मीठाचा हा सोपा उपाय ठरेल फायदेशीर

MLC Election : निवडणुकीआधीच महायुतीने ६ जागा जिंकल्या, ११ जागांसाठी आज मतदान; साताऱ्यापासून ते नागपूरपर्यंत नगरसेवक बजावणार हक्क

Operation Tiger : 'ऑपरेशन टायगर' लांबणीवर! या २ कारणांमुळे ६ खासदारांचा १९ जूनचा मुहूर्त हुकणार; एकनाथ शिंदेंची सावध पावले

डीलिमिटेशन बिलाच्या मंजुरीसाठी ठाकरेसेना फोडली? 2029च्या निवडणुकांसाठी भाजपची रणनीती?

SCROLL FOR NEXT