Syndrome Cause  Economics Times
महाराष्ट्र

Pune GBS News: पुण्यात गुलियन बॅरी सिंड्रोम का पसरतोय? तुमच्या घरात येणाऱ्या पाण्याशी आहे कनेक्शन

Guillain-Barré Syndrome : पुण्यात गुलियन सिंड्रोमने थैमान घातलंय. आतापर्यंत या आजाराने बाधित झालेली १०० प्रकरणं समोर आली आहेत. या आजाराचं वाढतं प्रमाण पाहता सरकार अलर्ट मोडवर आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन जाधव, साम प्रतिनिधी

पुण्यात गेल्या काही दिवसापासून ‘जीबीएस’ आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. हा आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याचेही राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (एनआयव्ही) अभ्यासातून समोर आलेले आहे. ‘जीबीएस’ रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुणे महापालिका आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी नांदेड येथील विहीर व अन्य ठिकाणची पाहणी केली होती.

सिंहगड रस्त्यावर गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) आजाराचे रुग्ण वाढत असल्याने महापालिकेने ११ ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी राज्य शासनाच्या प्रयोग शाळेत पाठवले होते. त्यातील सर्व ठिकाणचे पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल दिला आहे. तर पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने २७ ठिकाणचे पाण्याचे नमुने महापालिकेच्या प्रयोगशाळेत तपासले असता सर्व ठिकाणचे पाणी पिण्यास योग्य असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या पाणवठ्यावरील पाणी शुद्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नागरिकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी धायरी, किरकटवाडी, नांदोशी, नऱ्हे, नांदेड या भागाला पाणी पुरवठा होणाऱ्या जलस्त्रोतांच्या ठिकाणच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी राज्य शासनाच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने ११ ठिकाणचे पाण्याचे प्रत्येकी १०० मिलिलिटर पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्याचा अहवाल पुणे महापालिकेला प्राप्त झाला आहे.

किरकटवाडी येथील भैरवनाथ नगर, उज्वल निसर्ग सोसायटी, पंढरी निवास, ठकूबाई हगवणे निवास, आर. ओ. फिल्टर आंबेडकर सांस्कृतिक भवन जवळ, सोनवणेवस्ती, नानानगर, डीएसके विश्‍व जवळील जलकुंभ या सर्व ठिकाणचे पाणी पिण्यास योग्य असल्याचा निष्कर्ष राज्य शासनाच्या प्रयोगशाळेने काढला आहे. तसेच कानडे इस्टेट नांदेड येथील विहिरीत खडकवासला धरणातून येणारे पाणी शुद्धीकरण करण्यापूर्वी पाणी तपासले.

त्यामध्ये कोलीफॉर्म्स, थरमोटॉलरंट आणि ई. कोलाव हे जिवाणू आढळून आल्याने हे पाणी पिण्यास योग्य नाही. पण या विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकल्यानंतर हे पाणी शुद्ध होत असून, त्यातील जिवाणू नष्ट होतात. त्यामुळे ही पाणी पिण्यास योग्य आहे असे शासनाच्या अहवालात नमूद केले आहे. या विहिरीवरून नांदेड, किरकटवाडी, डीएसके विश्‍व, नांदोशी या भागाला पाणी पुरवठा होता. विहिरीतील पाणी प्रक्रिया केल्यानंतर शुद्ध असल्याचे या भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

पुण्यात गुलियन सिंड्रोमने थैमान घातलंय. आतापर्यंत या आजाराने बाधित झालेली १०० प्रकरणं समोर आली आहेत. या आजाराचं वाढतं प्रमाण पाहता सरकार अलर्ट मोडवर आले आहे. सीडीसी म्हणजेच रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांनुसार, ही एक दुर्मिळ स्थिती असून ज्यामुळे मज्जातंतूंना नुकसान होते. जेव्हा एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच नसांना नुकसान करू लागते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जीबीएसची प्रत्येक वयाच्या लोकांना होते.

दरम्यान जीबीएस आजारावर उपचारासाठी मोठा खर्च लागतो. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात या रूग्णांची संख्या वाढतेय. पुणेकरांनी या आजारावर मोफत उपचार केले जावेत, अशी मागणी केली होती. ही मागणी प्रशासनाकडून मान्य करण्यात आलीय. GBS आजरावर पुणे महानगर पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार केले जातील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT