Fifty Pigs died in buldana, Swine flu update  saam tv
महाराष्ट्र

Swine Flu : बुलडाण्यात खळबळ! ५० डुकरांचा मृत्यू, 'स्वाईन फ्लू'चा तिसरा रुग्णही आढळला

बुलडाणा शहरात 'स्वाईन फ्लू'चा आज तिसरा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.

संजय जाधव

बुलडाणा : बुलडाणा शहरात 'स्वाईन फ्लू'चा आज तिसरा रुग्ण (third patient found) आढळल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे मागील पंधरा दिवसांत बुलडाण्यात (Buldana) ५० डुकरांचा मृत्यू झाला आहे. या गंभीर घटनेबाबत नगरपालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. 'स्वाईन फ्लू'चा (Swine flu) जीवाणू डुकरांपासून पसरत असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी दिलीय. तसेच शहरातील डुक्कर तातडीनं हद्दपार करा, असे आदेशही डुक्कर पाळणाऱ्या (fifty pigs death) मालकांना दिले आहेत. संबंधीत आदेशाचे पालन न झाल्यास परिषद कायद्यानुसार डुकरांचा बंदोबस्त करून डुक्कर मालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

स्वाईन फ्लू हा आजार डुकरांशी संबधीत असल्याने भाजपचे माजी नगरसेवक अरविंद होंडे यांनी शहरातील डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.दरम्यान, नगर परिषद प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. तसेच मृत पावलेल्या डुकरांची विल्हेवाट लावून शहरात पावडर व धुराची फवारणी करीत आहेत.

मागील आठवड्यात येथील इकबाल चौकातील एका तरुणाचा स्वाईन फ्लूने बळी घेतला. त्यानंतर २८ वर्षीय तरुणीला स्वाईन फ्लू झाल्याचे समोर आलं होतं. सरस्वती नगरमधील ६० वर्षीय नागरिकही स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आला आहे. या नागरिकाला आठ दिवसांपूर्वी ताप आणि खोकल्याची लक्षणे होती. त्याला शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. संबधित डॉक्टरला संशय आल्यानंतर त्यांनी या रुग्णाचा स्वॅब तपासणीसाठी पाठविला. त्यानंतर सदर रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

Swiggy CEO networth : स्विगीचे सीईओंचं शिक्षण आणि नेटवर्थ किती?

Viral Video: भंयकर वास्तव! पाय ठेवायला जागा नाही, तरीही भाऊचा लोकलच्या दारात उभं राहून प्रवास, व्हिडीओ पाहा

Solapur Airport : सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून मुंबई आणि गोवासाठी विमानसेवा

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

SCROLL FOR NEXT