Swine Flu  Yandex
महाराष्ट्र

Swine Flu: चिंताजनक! नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूमुळे एकाचा मृत्यू; दोघांची प्रकृती गंभीर

Swine Flu In Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा स्वाईन फ्ल्यूचा धोका वाढला आहे. स्वाइन फ्ल्यूमुळे एकाचा मृत्यू तर दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Rohini Gudaghe

अभिजीत सोनवणे साम टीव्ही, नाशिक

नाशिकमध्ये पुन्हा एकदा स्वाईन फ्ल्यूचा धोका वाढला आहे. स्वाइन फ्ल्यूमुळे एकाचा मृत्यू तर दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सिन्नरमधील एका महिलेचा स्वाइन (Swine Flu In Nashik) फ्ल्यूमुळे मृत्यू झालेला आहे. तर नाशिक शहरातील दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

उपचार घेत असलेल्या असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत (Swine Flu) आहे. मात्र, स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. रुग्णांच्या संपर्कातील लोकांचे स्वॅब नमुने घेवून तपासणी करणार येणार आहे. डेंग्यूचा धोका कमी झाल्यानंतर स्वाइन फ्ल्यूचा धोका वाढल्यानं (Nashik News) आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे.

मागील वर्षी नाशिक शहरामध्ये डेंगूचे थैमान माजले होते. तर यंदा आता नागरिकांसमोर स्वाईन फ्ल्यूचं नवं संकट उभं राहिलं आहे. एकीकडे शहरात उन्हाचा पारा वर चढत (Nashik News) आहे, शहरामध्ये तापमानाने सोमवारी चाळीशी पार केली होती. त्यामुळे तापाच्या रूग्णांमध्ये मोठी भर पडत आहे. आता स्वाईन फ्ल्यूमुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला ६३ वर्षांची होती. त्यामुळे आता नागरिकांच्या चिंतेमध्ये मोठी भर पडत आहे.

नाशिक शहरामध्ये स्वाईन फ्लूचे दोन रुग्ण आढळल्यानंतर या दोन्ही रूग्णांचा अहवाल पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात (Swine Flu Update) आला होता. या रूग्णांमध्ये एक महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. या दोन्ही रूग्णांचे रिपोर्ट्स पॉझिटीव्ह आल्यानंतर आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे.

फेब्रुवारी महिन्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्या पार्श्वभूमीवर शासनाने डुकरांची किलींग प्रक्रिया सुरू केली होती. शहादा तालुक्यातील म्हसावद गावामधील डुकरांचा (Swine Flu News) अचानक मृत्यू झाला होता. त्यांची तपासणी केल्यानंतर मृत डुकरांना अफ्रिकन स्वाईन फिवरची लागन झाल्याचा अहवाल समोर आला होता. त्या पार्श्वभूमीवर डुकरांची किलींग प्रक्रियापुर्ण करुन परिसरात निर्जंतुकीकरण केलं गेलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : कपड्याच्या दुकानातून पावणे चार लाखांची रोकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

VIDEO : केलंय काम भारी, लुटली तिजोरी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

SCROLL FOR NEXT