Nagpur And Manmad Acciden google
महाराष्ट्र

Yavatmal Accident: यवतमाळमध्ये ट्रक आणि कारचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू

Accident: सध्या महाराष्ट्र विधानसभा मतदानाला सुरुवात झाली आहे आणि त्यातच अनेक अपघाताच्या बातम्या समोर येत आहेत.

Dhanshri Shintre

सध्या महाराष्ट्र विधानसभा मतदानाला सुरुवात झाली आहे आणि त्यातच अनेक अपघाताच्या बातम्या समोर येत आहेत. नागपूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे.

स्विफ्ट डिझायर कारने ऊसाच्या ट्रक्टरला मागून येऊन धडक दिली. धडकेत स्विफ्ट डिझायर चालक जागीच ठार झाल्याचे समोर आले. काही वेळेसाठी राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले आहे. स्विफ्ट डिझायरचं इंजन रस्त्यावर पडले आहे.

आर्णीवरून यवतमाळकडे जात असताना ऊसाच्या ट्रक्टरला मागून धडक दिल्याने स्विफ्ट डिझायरने चार ते पाच कोलांट्या मारल्याने वाहनाचा इंजन थेट रस्त्यावर पडला आणि वाहन रस्त्याच्या बाजुला जाऊन पडली. हा अपघात एवढा जबरदस्त होता की, वाहनाचं अक्षरश:तुकडे तुकडे झाले आहेत. महम्मद सैफ, महम्मद सत्तार राहणार यवतमाळ असे वाहनात जागीच मृत्यू झालेल्याचे नाव आहेत.

तसेच बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होवून भीषण अपघात झाला आहे. मनमाड - येवला रोडवर अंकाई फाट्यावरील ही घटना घडली असल्याची माहिती आहे. सकाळी 6:00 वाजता हा अपघात झाला. अपघातात ट्रकचालक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे, तर बस चालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. बसमधील पाच ते सहा प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर येवला, मनमाड उपजिल्हा रुग्णलयात उपचार सुरु आहेत.

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

SCROLL FOR NEXT