Swarajya Rakshak Sambhaji 
महाराष्ट्र

Swarajya Rakshak Sambhaji : छावाची धार, कोल्हेंवर वार, संभाजी मालिकेतील शेवटावरून वाद

Amol Kolhe : संभाजी मालिकेतील शेवटावरून वाद सुरू झाला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान न दाखवल्यानं अमोल कोल्हे ट्रोल झाले आहेत. त्यावर त्यांनी स्पष्टीकरणही दिलेय.

Bharat Mohalkar

Swarajya Rakshak Sambhaji : छावा सिनेमा हिट होत असताना स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या शेवटावरून अमोल कोल्हेंना टार्गेट करण्यात येतंय.....खरंच अमोल कोल्हेंनी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट गुंडाळला का? मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने करण्यासाठी नेमका कुणाचा दबाव होता? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.....

देशभर छावा सिनेमाची चर्चा सुरु असताना आता स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आल्याचा आरोप सोशल मीडियाच्या माध्यमातून कोल्हेंवर करण्यात येत आहे. त्यावर खासदार अमोल कोल्हेंनी स्पष्टीकरण दिलंय.. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने करण्यासाठी माझ्यावर दबाव होता, असा गौप्यस्फोट अमोल कोल्हेंनी केलाय..कोल्हेंनी सोशल मीडियावर उपस्थित केलेल्या 4 प्रश्नांना उत्तर दिलंय..

'संभाजी महाराजांचे हाल पाहणं आवडलं असतं?' स्वराज्यरक्ष मालिकेतील शेवटावरुन होत असलेल्या आरोपांवर कोल्हेंनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय? पाहूयात..

मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने बदलण्यासाठी माझ्यावर माध्यमांचा दबाव

नैतिक जबाबदारी पाळून स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट केला

मालिका टीव्हीवर दाखवण्यात येत असल्याने नियामक मंडळाची मार्गदर्शक तत्वं पाळावी लागली

हिंसाचार आणि रक्त दाखवण्याबाबत टीव्हीचे काही नियम असतात

मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन मालिकेचा शेवट दाखवला

मालिकेतील प्रसंगांबाबत पवारांनी कधीही दबाव टाकला नाही

छावा सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करुन मारण्यात आल्याचा सीन दाखवण्यात आलाय.. मात्र हा सीन कोल्हेंच्या स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतून वगळण्यात आल्याचा मुद्दा पकडून ट्रोलर्स कोल्हेंवर वार करत आहेत....कोल्हेंनी दबावाचं कारण पुढं केलं असलं तरी हा दबाव कुणी टाकला होता? आणि का टाकला होता? या प्रश्नांची उत्तरंही समोर येणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT