ravikant tupkar 
महाराष्ट्र

शेतक-यांच्या खात्यात ५० हजार रुपये जमा करा : रविकांत तुपकर

संजय जाधव

बुलढाणा : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे buldhana rain हातात आलेल्या पीक शेतक-यांच्या डाेळ्या देखत वाहून गेले आहे. दरम्यान शेतकरी वर्गास या संकटातून तातडीने बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने हेक्टरी ५० हजार रुपये शेतक-याच्या खात्यात जमा करावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर ravikant tupkar यांनी येथे केली आहे. swabhimani-shetkari-sanghtana-leader-ravikant-tupkar-demands-to-declare-wet-drought-in-maharashtra-sml80

तुपकर म्हणाले राज्यात अतिवृष्टीमुळे माेठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. जर सरकारकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्यास मंत्री, आमदार व खासदारांचे वेतन काही काळासाठी थांबवावे अथवा रद्द करावेत असे तुपकरांनी नमूद केले. ते म्हणाले कंपन्यांकडून सीएसआर निधी जमा करावा मात्र शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी तुपकर यांनी केली आहे.

तुपकर यांनी बुलडाणा जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. दरम्यान वीज वितरण कंपनीने थकबाकीदारांचे वीज कनेक्शन ताेडण्यास सुरुवात केली आहे. हे चुकीचे असल्याचे रवीकांत तुपकर यांनी नमूद केले. वीज वितरण कंपनीने हा प्रकार थांबवावा अन्यथा स्वाभिमानी जशास तसे उत्तर देईल असा इशारा देखील तुपकर यांनी दिला.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT