Swabhimani Shetkari Sanghatana Rasta Roko Andolan In Anavali saam tvn
महाराष्ट्र

Pandharpur: उजनीच्या पाण्यासाठी 'स्वाभिमानी'ने राेखला महामार्ग

या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळित झाली होती. दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

भारत नागणे

पंढरपूर : इंदापूर (indapur) तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेला सोलापूर (solapur) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी (farmers) विरोध केला आहे. त्यात आता स्वाभिमानी शेतकरी संघटना (swabhimani shetkari sanghatana) ही आक्रमक झाली आहे. लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना तत्काळ रद्द करावी या मागणीसाठी आज (मंगळवार) संघटनेच्या वतीने पंढरपूर -विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील अनवली‌ चौकात रास्ता रोको आंदोलन (rasta roko andolan) केले. (pandharpur latest marathi news)

उपसा सिंचन योजना रद्द करा अन्यथा बारामतीच्या दारात आंदोलन करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी दिला. आंदाेलकांनी सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळित झाली होती. दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

यावेळी शेतक-यांनी उजनीचे पाणी पळवणा-या पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान आज रास्ता राेकाे आंदाेलन छेडले मागणी मान्य झाल्यास तीव्र आंदाेलन छेडू असा इशारा स्वाभिमानीने प्रशासनास दिला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Card Update: आधार कार्ड मोफत अपडेट करा; मुदत वाढली; शेवटची तारीख कधी?

Maharashtra Weather Update : दुपारी उन्हाचा चटका, पहाटे गारठा, वाचा राज्यातील हवामानाचा अंदाज

IRCTC App: रेल्वे प्रवाशांचं काम झटक्यात अन् सोपं होणार, तिकीट बुकिंगपासून सगळ्या सुविधा एकाच अ‍ॅपवर

मोठी कारवाई! अमरावतीमध्ये तब्बल ६ कोटींचे सोनं-चांदी जप्त, नागपूरवरुन निघालेल्या गाडीत सापडले घबाड!

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत बेधडक कारवाई, एकनाथ शिंदेंनी बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची केली हकालपट्टी!

SCROLL FOR NEXT