swabhimani shetkari sanghatana rail roko andolan at harangul railway station  saam tv
महाराष्ट्र

Swabhimani Shetkari Sanghatana : हरंगुळ रेल्वे स्थानकावर 'स्वाभिमानी'चे कार्यकर्ते पाेलिसांच्या ताब्यात, बुलढाण्यात रविकांत तुपकरांना अटक

Siddharth Latkar

- शुभम देशमुख / संजय जाधव

Latur News :

शेतक-यांच्या विविध मागण्यांच्या पुर्तता हाेत नसल्याने आज (शुक्रवार) स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह (swabhimani shetkari sanghatana) शेतक-यांना लातूर येथील हरंगुळ रेल्वे स्थानकावर (harangul railway station) रेल राेकाे करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदाेलकांना पाेलिसांनी ताब्यात घेतले. (Maharashtra News)

शेतकरी म्हणाले सोयाबीन, ऊस, कापूस उत्पादकांकडे सरकार जाणिवपूर्वक लक्ष देत नाहीये. शेतमजूर आणि निराधार यांच्या प्रश्नांवर देखील सरकार दुर्लक्ष करीत आहे. सरकारच्या कारभाराचा निषेध नाेंदवित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घाेषणाबाजी केली.

दरम्यान शेतक-यांच्या आंदाेलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावर पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला हाेता. शेतकऱ्यांना तसेच शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रेल राेकाे करु नये यासाठी पोलिसांनी त्यांना आवाहन केले. परंतु शेतक-यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहताच पाेलिसांनी शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रविकांत तुपकरांना बुलढाणा न्यायालयात नेले

बुलढाणा जिल्ह्यात रेल राेकाे करण्याचा इशारा दिलेल्या शेतकरी नेते रविकांत तुपकर (ravikant tupkar) यांना रात्री पाेलिसांनी ताब्यात घेतले हाेते. आज (शुक्रवार) त्यांना बुलढाणा न्यायालयात पाेलिसांनी हजर केले आहे. यावेऴी न्यायालय आणि बुलढाणा शहर पोलीस स्टेशन समोर तुपकर समर्थकांची गर्दी झाली हाेती.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Kili Paul Dance : किली पॉलने भोजपुरी गाण्यावर धरला ठेका, 'लॉलीपाप लागेलू'वर जबरदस्त डान्स; हुकस्टेपने वेधलं लक्ष

Shahajibapu Patil : उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत; काळ्या दगडावरची पांढरी रेघ, ५० खोक्यांवरून शहाजीबापू खवळले

Mrunal Thakur: मृणाल ठाकूरविषयी माहित नसलेल्या गोष्टी

Navratri Special Dish: नवरात्रीसाठी रोज काय बनवायचं हा प्रश्न पडलाय का?

SCROLL FOR NEXT