sawbhimani shetkari sanghtana 
महाराष्ट्र

थकीत ऊसबिलासाठी 'स्वाभिमानी' चा तहसील कार्यालयावर माेर्चा

यापुर्वी शेतक-यांना बिलांसंदर्भात आश्वासन देण्यात आले हाेते. मात्र त्याची पुर्तता झाली नाही.

विजय पाटील

सांगली : थकित ऊस बिलासाठी आज (गुरुवार) स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (sawbhimani shetkari sanghtana) तासगाव तहसिल कार्यालयावर माेर्चा काढला. तासगाव आणि नागेवाडी कारखान्याने अद्याप थकीत ऊस बिल दिले नसल्याने शेतकरी वर्गात राेष निर्माण झालेला आहे. त्यातूनच आजच्या माेर्चात सहभागी झालेल्या शेतक-यांची संख्या लक्षणीय हाेती.

सांगलीमधील (sangli) तासगाव आणि नागेवाडी कारखान्याने आजमितीस सुमारे तीस काेटी रकमेची बिलं शेतकऱ्यांना (farmers) मिळवून दिली आहेत. परंतु अद्याप काही शेतकऱ्यांना त्यांची बिले मिळाली नाहीत. यापुर्वी शेतक-यांना बिलांसंदर्भात आश्वासन देण्यात आले हाेते. मात्र त्याची पुर्तता झाली नाही.

याबाबत स्वाभिमानीचे नेते महेश खराडे म्हणाले शेतक-यांना २२ डिसेंबर पर्यंत सर्व बिले देतो असे लेखी पत्र तहसीलदार यांना देण्यात आले होते. त्याची अंमलबजावणी न झाल्याने आजचा माेर्चा हाेता. स्वाभिमानी शेतकरी संघटना (swabhimani shetkari sanghatana) तहसीलदारांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर जोरदार पाऊस

Rain Alert : राज्यात मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार! ३१ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता; IMD चा मोठा अलर्ट

Building Collapse : भिवंडी हादरली! ४ मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली; दोघांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती

PM modi Video : पेपर लीकप्रकरणी पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ मेसेज, घोटाळेबाजांना कडक इशारा

Today's Horoscope : 'या' ६ राशींसाठी शु्क्रवार अत्यंत भाग्यशाली! अचानक होणार धनलाभ? पाहा तुमचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT