Chandur Railway City, Swabhimani Shetkari Sanghatana, Ravikant Tupkar saam tv
महाराष्ट्र

Swabhimani Shetkari Sanghatana : रविकांत तुपकरांच्या अटकेनंतर 'स्वाभिमानी' आक्रमक,'आता महाराष्ट्र पेटून उठेल'

शनिवारी रविकांत तुपकर यांनी पाेलिसांनी अटक केली.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

SWABHIMANI SHETKARI SANGHATANA News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar Aandolan) यांना बुलढाणा (buldhana) येथे पिक विमा व शेतीच्या नुकसान भरपाईचे पैसे मिळण्यासाठी केलेल्या आंदोलनादरम्यान पाेलिसांनी (police) अटक (arrest) केल्याचा निषेध आज अमरावती (amravati) येथे स्वाभिमानीने नाेंदविला. चांदूर रेल्वे (chandur railway) येथे शेतक-यांसह (farmers) कार्यकर्ते यांनी चक्काजाम आंदाेलन छेडले.

चांदुर रेल्वे मध्ये शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदाेलन करून शासनाचा तीव्र शब्दात निषेध केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत पिक विम्याची रक्कम व नुकसान भरपाई तात्काळ मिळावी अशी मागणी देखील आंदाेलकांनी केली.

हे आंदाेलन प्रवीण मोहोड (शेतकारी संघटना, जिल्हाध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी कपिल पडघम यांच्यासह शेकडाे कार्यकर्ते आंदाेलनात सहभागी झाले हाेते. यावेळी पाेलिसांनी आंदाेलकांना ताब्यात घेतले. या आंदाेलनामुळे वाहतुक खाेळंबली हाेती. दरम्यान आंदाेलकांनी शेतक-यांना न्याय द्यावा तसेच तुपकर यांच्यावरील अन्याय दूर न झाल्यास संपुर्ण महाराष्ट्र पेटून उठेल असा इशारा दिला. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: हाजीर हो! राहुल गांधींच्या अडचणी वाढणार, सावरकरांच्या बदनामी प्रकरणात न्यायालयाचं समन्स

Uddhav Thackeray : मुंबईवर घाला घातला तर हम काटेंगे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल,VIDEO

Watch Video: पावले धरती परतीची वाट! अरं 'देवा' भाऊच्या सभेकडे बहिणींनी फिरवली पाठ

Kolhapur Politics : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा प्रकार; कोल्हापुरात प्रचार पत्रकावर तांदूळ, कापलेला लिंबू, अंगारा

Inflation: महागाई कमी होणार? नेटकऱ्याच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

SCROLL FOR NEXT