swabhimani shetkari sanghatana andolan in pandharpur mseb office for regular power supply saam tv
महाराष्ट्र

Swabhimani Shetkari Sanghatana : शेतीसाठी सलग आठ तास वीजपुरवठा करा; पंढरपूर 'स्वाभिमानी'ची मागणी

शेतकरी आर्थिक गर्तेत असून सरकारने शेतक-यांच्या प्रश्नावर ताेडगा काढावा अशी मागणी करण्यात येत आहे.

भारत नागणे

Pandharpur News :

शेतीसाठी किमान 8 तास वीजपुरवठा द्यावा या मागणीसाठी आज (मंगळवार) स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (swabhimani shetkari sanghatana) आंदाेलन छेडले. 'स्वाभिमानी'ने पंढरपूर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर जाेरदार घाेषणाबाजी केली. त्यानंतर आंदोलकांनी प्रशासनास मागण्यांचे निवेदन दिले. (Maharashtra News)

सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले आहे. त्यामुळे शेतीसाठी फक्त दोन तास वीज पुरवठा दिला जात आहे. पुरेशा प्रमाणात वीज पुरवठा होत नसल्याने पंढरपूर तालुक्यातील नदीकाठच्या गावातील पिकांचे नुकसान झाले आहे.

यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतक-यांना पाणी दिले पण वीज मिळत नाही. त्यामुळे नियमीत आणि सुरळीत वीज पुरवठा द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वीज वितरण कार्यालयास निवेदन देत केली. यावेळी माेठ्या संख्येने शेतकरी उपस्थित हाेते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ६५६५ पदांसाठी होणार भरती; रेल्वे मंत्रालयाने दिली मंजुरी

हृदयद्रावक! दिंडोरीमध्ये कार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू; मृतांची नावे आली समोर

Maharashtra Live News Update : बिबट्याची दहशत, उन्हाचा तडाखा आणि गारपिटीचा कहर; मेंढपाळांवर तिहेरी संकट

Gold Price Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल, वाचा २२ अन् २४ कॅरटचे आजचे दर

Namo Shetakri Yojana: शेतकऱ्यांनो नमो शेतकरी योजनेचे ₹२००० मिळाले का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

SCROLL FOR NEXT