swabhimani shetkari sanghatana, satara, sugarcane price, farmers, sangli
swabhimani shetkari sanghatana, satara, sugarcane price, farmers, sangli saam tv
महाराष्ट्र

Swabhimani Shetkari Sanghatana : कराडात पाेलिस संरक्षणात ऊस वाहतूक सुरु; सांगलीत दीडशे वाहने राेखली

विजय पाटील, संभाजी थोरात

Sugarcane Price : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने (swabhimani shetkari sanghatana) गेल्या दाेन दिवसांपासून राज्यभरात ऊसतोड बंद आंदोलन सुरु आहे. गुरुवारी सातारा आणि सांगली जिल्ह्यात शेतक-यांच्या काही वाहनांच्या टायरची हवा साेडणे, पेटवून देणे असा प्रकार घडले. आज (शुक्रवार) कराडला पाेलीस सरंक्षणात ऊस वाहतुक सुरु आहे तर सांगलीत शेतक-यांनी ऊस वाहतुक राेखून धरली आहे तसेच काही ठिकाणी गांधीगिरी पद्धतीने ऊसतोड बंद करण्यात आली.

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील उदगिरी साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रात्री पासून तब्बल दीडशे ट्रक्टर अडविले. तसेच कारखाने बंद ठेवण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी (farmers) संघटनेने दिला आहे. जर ऊस वाहतूक आढळून आल्यास वाहने पेटवून देऊ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी दिला. (Maharashtra News)

एकरकमी एफआरपी मिळाली पाहिजे, तीन टप्प्यात एफआरपी देण्याचा राज्य शासनाने केलेला कायदा रद्द करावा, वजन काटे ऑनलाईन झाले पाहिजेत, रिकव्हरीतील चोरी थांबली पाहिजे, तोडीला द्यावे लागणारे पैसे बंद झाले पाहिजेत आदींसह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानीने आंदोलना छेडल्याची माहिती महेश खराडे यांनी दिली.

दरम्यान सातारा (satara) जिल्ह्यात शेतकरी संघटनांच्या आंदोलनाचा पाेलिसांनी धसका घेतल्याचे आज दिसून आले. ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरला पोलीसांनी संरक्षण दिले आहे. जाेपर्यंत कराड तालुक्यातील साखर कारखान्यांनी लवकरात लवकर ऊसदर जाहीर करावा अन्यथा आंदाेलन तीव्र केले जाईल असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : वादविवाद टाळा, बेताने वागा; वृषभसह ४ राशींना आज 'या' गोष्टी घ्यावी लागणार काळजी

Rashi Bhavishya : 'या' राशींना आज मिळेल सुखाचा गारवा, वाचा राशिभविष्य

iVOOMi Energy: एका चार्जमध्ये अख्खी मुंबई पालथी घालता येईल! जबरदस्त रेंजसह लॉन्च झाली JeetX ZE इलेक्ट्रिक स्कूटर

Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडून नका ठेवू निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा; काय म्हणतं अंकशास्त्र?

Apple IPad Air आणि IPad Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

SCROLL FOR NEXT