भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन; भास्कर जाधव का संतापले ?  saam tv
महाराष्ट्र

भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन; भास्कर जाधव का संतापले ?

पुढील एक वर्षासाठी त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Monsoon session : राज्याचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले. मात्र या अधिवेशनाला पहिल्याच दिवशी गालबोट लागले. ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरून विरोधी पक्षातील आमदार तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यावर धावून गेले. इतकेच नव्हे, अध्यक्षांशी त्यांनी गैरवर्तन करत त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. सभागृहाची प्रतिमा खराब केल्याने या आमदारांवर ही करवाई करण्यात आली आहे. पुढील एक वर्षासाठी त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. (Suspension of 12 BJP MLAs; Why did Bhaskar Jadhav get angry)

यानंतर तालिका अध्यक्षांनी संजय कुटे, राम सातपुते, अतुल भातखाळकर, अभिमन्यु पवार, जयकुमार रावल, नारायण कुचे, गिरीश महाजन, आशीष शेलार, पराग आळवणी, योगेश सागर, कीर्तीकूमार भांगडिया, हरिष पिंपळे या भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन केले आहे.

या गोंधळानंतर सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. कामकाज सुरू होण्यापूर्वी संतापलेल्या भाजपा आमदारांनी थेट अध्यक्षांनाच अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. मात्र कामकाज सुरू झाल्यानंतर संतापलेल्या भास्कर जाधव यांनी सभागृहांतील गैरवर्तनाबाबत भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन करण्याचा ठराव संमत केला.

-का संतापले तालिका अध्यक्ष भास्कर जाधव

कामकाज सुरू झाल्यानंतर भास्कर जाधव यांनी स्वतः घडलेल्या सर्व प्रकारांवर भाष्य केले. ''आजचा दिवस हा माझ्यासाठी काळा दिवस आहे. आज जे घडल ते सभागृहाच्या इतिहासात कधीही घडल नाही. सभागृहाच्या दालनात विरोधी पक्षातील सदस्यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे, ही बाब अत्यंत लांच्छनास्पद आहे. सभागृहाचे कामकाज सुरू असताना असे अनेकदा होते की, सत्ताधारी पक्षांचे उत्तर विरोधी पक्षाला पटत नाही, पण ते निर्णय मान्य करून सर्वांनी पुढे जाणे हा, सभागृहांच्या कामकाजाचा एक भाग आहे. पण सभागृहांच्या इतिहासात असे कधीही घडले नव्हते. मी आक्रमक आहे, रोखठोक आहे, मला खोट बोलायला आवडत नाही आणि मी दिलेली वेळही मोडत नाही. मी गेल्या 36 वर्षांपासून सभागृह सदस्य आहे. मंत्री बाळासाहेब थोरात देखील गेल्या अनेक वर्षांपासून सभागृहात सदस्य आहेत, असेही भास्कर जाधव यावेळी सांगितले.

सभागृहात कितीही गोंधळ, मतभेद होऊ देत, पण एकदा जर कामकाज तहकूब झाले तर तो विषय तिथेच थांबतो. सभागृहाबाहेर गेल्यावर आपण कधी ही कटुता ठेवत नाही. सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर मी स्वतः सर्वांची भेट घेत असतो. ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. मात्र सभागृहात गोंधळ झाला आणि विरोधकही प्रचंड संतापले. संतापलेल्या विरोधी पक्षाच्या आमदारांनी थेट तालिका अध्यक्षांनाच अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. आपण सभागृहाबाहेर गेलयावर तोडगा काढू असे अनेकदा सांगूनही सदस्यांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. त्यातील काही आमदारांनी अध्यक्षांच्या समोरील माइक आणि हेडफोनशीदेखील छेडछाड केली. त्यानंतर अनेकदा सांगूनही त्यांनी न ऐकल्याने संतापलेल्या भास्कर जाधव यांनी या 12 ही आमदारांचे निलंबन केले.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबई गोवा महामार्गावर ८ सिलेंडरने भरलेल्या टेम्पोने घेतला पेट

ICC vs BCB: वर्ल्डकपआधी बांगलादेशच्या अडचणी वाढल्या, ICC नं फटकारलं, सरकार आता काय निर्णय घेणार?

Sheet Mask : तुम्ही चेहऱ्यावर शीट मास्क लावता? मग 'हे' ५ टॉप फायदे जाणून घ्या

Crime News : २ मुलांच्या आईचं दुसऱ्यासोबत सूत जुळलं, वैतागलेल्या नवऱ्यानं आयुष्य संपवलं, बीडमधील धक्कादायक प्रकरण

Homemade Skin care Tips: केमिकलयुक्त महागड्या क्रिमला करा बाय बाय, आता घरातील 'या' 5 गोष्टींनी मिळवा चेहऱ्यावर काचेसारखी चमक

SCROLL FOR NEXT