Police arrested culprit saam tv
महाराष्ट्र

अल्पवयीनचे अपहरण आणि अत्याचार प्रकरण : एक कोटींची लाच मागणारा निलंबित पोलीस गजाआड

अल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि अत्याचार प्रकरणात आरोपी निलंबित पोलीस अधिकारी फरार होता, पण...

साम टिव्ही ब्युरो

जीवन पाटील

सांगली : पुणे जिल्ह्यातील देहूरोड येथील शेतकऱ्याकडे (Bribe Crime) एक कोटी रुपयांची लाच मागणाऱ्या निलंबित पोलीस कॉन्स्टेबलला कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी अटक केलीय. जॉन तिवडे असं (culprit arrested) अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. २०२० मध्ये नातेवाईक असलेल्या एका अल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि अत्याचार प्रकरणात आरोपी तिवडे विरोधात कुपवाड पोलीस स्टेशमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सदर आरोपी दोन वर्षांपासून फरार होता. पंरतु, पोलिसांनी (Police) या प्रकरणाचा छडा लावला असून आरोपी जॉन तिवडेला अटक केली आहे. तिवडेला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.

काय घडलं होतं ?

आरोपी जॉन तिवडेने देहूरोड येथील शेतकऱ्याकडे एक कोटी रुपयांची लाच मागितली होती. महसूल न्यायाधिकरणमध्ये दाखल खटल्यांचा निकाल शेतकऱ्याच्या बाजूने लावून देण्याचं आमिष तिवडेनं दाखवलं होतं. त्यानंतर तिवडे विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मात्र, आरोपी तिवडे फरार झाला होता.

तसेच त्याच्या विरोधात कुपवाड पोलीस ठाण्यात २०२० मध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. कुपवाड पोलिसांच पथक जॉन तिवडेचा शोध घेत होते. मात्र, तो पोलिसांना नेहमी चकवा देत फरार व्हायचा. दरम्यान, आज सकाळी तिवडे मिरजेत आल्याची खबर मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली, अशी माहिती कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अविनाश पाटील यांनी दिली आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ginger garlic paste: 'या' पदार्थांमध्ये फोडणीमध्ये चुकूनही आलं-लसूण पेस्ट वापरू नका

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यास सुरुवात; ४८०कोटी रुपये वाटपास मंजुरी, कोणत्या जिल्ह्यांना मिळेल मदत

Thurday Horoscope : हितशत्रूंचा त्रास संभवतोय, अडचणी मागे लागतील; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात साडेसातीचे संकेत

Ratnagiri Tourism: रत्नागिरीपासून ४० किमी अंतरावर आहे सुंदर मंदिर; ८०० वर्ष जुन्या या मंदिराला नक्की भेट द्या

Maharashtra Live News Update: हिंगोलीत शरद पवारांच्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

SCROLL FOR NEXT