Sushma Andhare On Devendra Fadnavis Saam Digital
महाराष्ट्र

Sushma Andhare News: देवेंद्र फडणवीस का होतायेत जबाबदारीतून मुक्त? कोणाचं होणार कमबॅक? सुषमा अंधारेंनी थेट नावचं सांगितलं

Sushma Andhare On Devendra Fadnavis's Resignation Wish: महाराष्ट्रात लोकसभेच्या कमी जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे. त्यावर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sandeep Gawade

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला म्हणावं तसं यश मिळालेलं नाही. भाजपला तर अवघ्या ९ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्रातील भाजपचे मोठे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षनेतृत्त्वाने आपल्याला जबाबदारीतून मुक्त करावं, अशी विनंती केली आहे. त्यावर सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

लोकसभेत जो फटका सहन करावा लागला आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. तसंच मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून देखील भाजप त्यांना विधानसभा निवडणुकीत उतरवेल असं वाटत नाही. फडणवीस यांची ज्या ज्या नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. मग ते चंद्रकांतदादा पाटील असतील पंकजा मुंडे असतील किंवा सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे असतील. तरीही इतकं सगळ होऊनही सा सर्वांमध्ये टीकून राहिले ते विनोद तावडे कमबॅक करू शकतात असं, सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या देशात आणि राज्यात प्रचारासाठी पक्षातील नेत्यांनी अगदी शेवट्या कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी मेहनत घेतली. मात्र राज्यात भाजपला कमी जागा मिळाल्या आहेत. जागा कमी आल्या तरी जनतेने आम्हाला नाकारलेलं नाही. राज्यात आलेल्या पराभवाची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

राज्यातील पराभवाची स्वीकारत पक्षश्रेष्ठींकडे विधानसभेसाठी पूर्ण वेळ काम करायचं आहे. त्यामुळे सरकारमधील जबाबदारीमधून मूक्त करावं आणि पक्षामध्ये पूर्णवेळ काम करण्याची जबाबदारी द्यावी, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.. सरकारमधून मुक्त झाल्यामुळे लोकसभा निवडणुकांमध्ये कुठे कसूर राहिली, कोणत्या उणिवा राहिल्या, त्यावर विचार करून काम करता येईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Red Fort Heist : राजधानीत सुरक्षेचा चिंधड्या, किल्ल्यामधून १ कोटींच्या सोन्याचा कलश चोरीला

Ganpati Visarjan : मुंबईतील 'या' गणपतीचे विसर्जन नाही, गणरायाला पुन्हा चौपाटीवरून मंडपात आणणार, मंडळाने का घेतला निर्णय?

आजारपणामुळे मोठ्या भावाचा मृत्यू, निधनाचे वृत्त कळाताच धाकट्याने जागीच सोडलं प्राण; संपूर्ण गावावर शोककळा

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

SCROLL FOR NEXT