Sushma Andhare on CM Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

Sushma Andhare on CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिल्लीवरून राजीनामा तयार ठेवण्याबाबत सूचना, सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट

Sushma Andhare on CM Eknath Shinde: भाजप एकनाथ शिंदे यांना कधीही वाऱ्यावर सोडू शकते असं दिसत आहे.

साम टिव्ही ब्युरो

रणजीत माजगावकर

Kolhapur News : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खळबळजनक दावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीवरून राजीनामा तयार ठेवण्याबाबत सूचना दिल्या असल्याचं वृत्त गुजरातमधील वृत्तपत्रात छापलं असल्याची माहिती सुषमा अंधारे यांनी दिली आहे.

सुषमा अंधारे यांनी म्हटलं की, गुजरातमधील वृत्तपत्रात बातमी येते की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्ली हेडक्वॉर्टरमधून राजीनामा तयार ठेवण्याबाबत सूचना आल्या आहेत. याचाच अर्थ असा की भाजप एकनाथ शिंदे यांना कधीही वाऱ्यावर सोडू शकते असं दिसत आहे. (Latest News Update)

यावेळी राहुल नार्वेकरांच्या वक्तव्याचा दाखला देत सुषमा अंधारे यांनी म्हटलं की, यावर राहुल नार्वेकरांनी स्पष्ट भूमिका मांडली नाही. याचा अर्थ पडद्याआडची भाजपची ठरलेली भूमिका आहे, ती म्हणजे भाजप एकनाथ शिंदेना कधीही वाऱ्यावर सोडू शकते.

राहुल नार्वेकर यांनी म्हटलं होतं की, बऱ्याचदा पडद्याआड काय घडते हे पडद्यासमोर येऊन सांगता येत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीला काहीही धोका नाही, असंही नार्वेकर सांगत आहेत. (Political News)

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचवरही सदोषवधाचा गुन्हा दाखल करावा

खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्माघातामुळे 14 श्री सदस्यांना आपला प्राण गमवाला लागला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचवरही सदोषवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.

या कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे. तसेच संबंधित कंपनी ब्लॅकलिस्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; कायदेंकडून पदाचा तडकाफडकी राजीनामा

इंजेक्शन लावून सफरचंद विक्रीचा आरोप, चौकशीत निर्दोष सापडला; आता विक्रेत्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ

Maharashtra Live News Update: जनतेच्या विश्वासाला न्याय देण्याचा प्रयत्न - सुनेत्रा पवार

8 व्या वेतन आयोगाआधी सरकारचं कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, होळीच्या आधी गुड न्यूज

ICC T20 WC: सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला सुपर८चे किती सामने जिंकावे लागतील? समजून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT