Sushma Andhare News Saam TV
महाराष्ट्र

Sushma Andhare News: ठिकाण आणि वेळ तुम्ही ठरवा, मी नि:शस्त्र यायला तयार; सुषमा अंधारेंचं मनसेला ओपन चॅलेंज

Shalini Thackeray On Sushma Andhare: शालिनी ठाकरेंनी सुषमा अंधारेंवर केलेल्या टीकेला त्यांनी सडेतोड उत्तर देत ओपन चॅलेंज केलंय.

Ruchika Jadhav

Maharashtra Politics:

गणेशोत्सवात वाजवण्यात आलेल्या डीजेवरून मनसे आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे. मनसे नेत्या शालिनी ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्यामध्ये वार पलटवार पाहायला मिळतोय. शालिनी ठाकरेंनी सुषमा अंधारेंवर केलेल्या टीकेला सडेतोड उत्तर देत त्यांनी ओपन चॅलेंज केलंय. (Latest Marathi News)

सुषमा अंधारेंचं ट्वीट

"भडकले..गुर्गुरले..dj...जाळ..डरकाळी..अरे बापरे..!बाई, ठिकाण, वेळ, दिवस तुम्ही ठरवा. मी नि:शस्त्र एकटी यायला तयार आहे." अशा शब्दांत सुषमा अंधारेंनी शालिनी ठाकरेंना ओपन चॅलेंज केलंय. तसेच आपल्या ट्वीटर अकाउंटवर पोस्ट शेअर करत पुढे त्यांनी लिहिलंय की, " पण खरं सांगा, नांदेड आणि संभाजीनगरचे बळी याबद्दल तुमच्या आतड्याला अजिबात पिळ पडत नाही का? मी मुद्द्यावर बोलतेय, चिप पब्लिसिटीसाठी लुडबुड का करताय?" असा खरमरीत सवाल विचारला आहे.

नेमकं काय घडलं?

गणेशोत्सवात डीजेच्या मोठ्या आवाजांमुळे वृद्ध तसेच लहान मुलांनाही त्रास होतो. यात वापरल्या जाणाऱ्या लाईट्समुळे बऱ्याच व्यक्तींना डोळ्यांचे त्रास होऊ लागलेत. यावरून राज ठाकरेंनी डीजे न वाजवता पारंपारीक वाद्यांनी आनंद, उत्साह साजरा करावा असं म्हटलं होतं. त्यावरून सुषमा अंधारेंनी नातवाला त्रास झाला म्हणून बडा नेता बोलेल, असा टोला लगावला होता. यावरून शालिनी ठाकरेंनी सुषमा अंधारेंवर टीकास्त्र सोडलं होतं.

शालिनी ठाकरेंचं ट्वीट

"अंधारे बाई, या पुढे याद राखा. संबंध नसताना जर राज साहेबांच्या नातवाला आपण राजकारणासाठी बोललात तर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तुमच्या कानाजवळ डि.जे. वाजवल्याशिवाय राहणार नाही." अशा शब्दांत अंधारेंवर हल्लाबोल करण्यात आला होता. त्यामुळे यावरून सुषमा अंधारेंनी पुन्हा एकदा शालिनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Bite: साप चावल्यावर लगेच काय करावे?

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Manikrao Kokate: राजीनाम्याऐवजी माणिकराव कोकाटेंचं खातेबदल होणार? अजित पवारांची नाराजी

Pune Traffic : पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार, ३ राष्ट्रीय महामार्गांवरील उपाययोजना ठरतील रामबाण

Tiger Attack : गुरांना चारा घेण्यासाठी गेले असता वाघाचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, आठवड्याभरातील दुसरी घटना

SCROLL FOR NEXT