Beed Political News Saam tv
महाराष्ट्र

Beed Political News: ठाकरे गटाच्या वादात शिंदे गटाची उडी; सुषमा अंधारे यांना त्यांच्या विभक्त पतीनेच दिला इशारा, म्हणाले...

बीडमधील ठाकरे गटाच्या वादात आता शिंदे गटाने उडी घेतली आहे.

विनोद जिरे

Beed News: बीड जिल्ह्यात महाप्रबोधन यात्रेच्या अगोदरचं शिवसेना ठाकरे गटात चांगलंच घमसान सुरू झालं आहे. जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारेंवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच त्यांनी सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा देखील केला आहे. तर आपल्याला मारहाण झाली नाही, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. तर या ठाकरे गटाच्या वादात आता शिंदे गटाने उडी घेतली आहे. (Latest Marathi News)

शिंदे गटात प्रवेश केलेल्या सुषमा अंधारे यांच्या विभक्त पतीने थेट उद्याची महाप्रबोधन यात्रेची होणारी सभा उधळून लावण्याचा इशाराच दिला आहे. सभेच्या नावाने अधिकाऱ्यांकडून जमा केलेले 5 लाख रुपये परत करा, अन्यथा उद्या होणारी ही महाप्रबोधनची सभा उधळून लावू, असा इशारा वैजनाथ वाघमारे यांनी दिला आहे.

'सभाच नाही, तर यानंतरही महाराष्ट्रात होणाऱ्या ठाकरे गटाच्या सर्वच सभा आम्ही बाळासाहेबांचे आणि एकनाथ शिंदेंचे कट्टर आणि कडवट शिवसैनिक उधळून लावू, असाही इशारा सुषमा अंधारे यांचे विभक्त पती आणि शिंदे गटाचे बीड जिल्ह्यातील नेते वैजनाथ वाघमारे यांनी दिला आहे.

बीडमध्ये नेमकं काय घडतंय?

आप्पासाहेब जाधव यांचा सुषमा अंधारेंना मारहाण केल्याचा दावा केला आहे. आप्पासाहेब जाधव यांच्या या दाव्यानंतर त्यांना उद्धव ठाकरे शिवसेना पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षातून हकालपट्टी झाली तरी सुषमा अंधारे यांना दोन चापटी लगावल्या असल्यावरून आप्पासाहेब जाधव ठाम आहेत.

सुषमा अंधारे यांनी मात्र आपल्याला मारहाण झाली नसल्याचे सांगितले आहे. तरी देखील आपला राग अनावर झाला आणि आपण सुषमा अंधारे यांना मारहाण केली, असल्याचे वक्तव्य आप्पासाहेब जाधव यांनी पुन्हा केले आहे. तसंच, वारंवार कार्यकर्त्यांना सुषमा अंधारे यांच्याकडून पैशाची मागणी देखील होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT