Jayant Patil  Saam Tv
महाराष्ट्र

सुरेश लाड यांनी राजीनामा दिलेला नाही; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड - जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड (Suresh lad) यांनी कोणताही राजीनामा दिलेला नाही. असे स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिले आहे. त्यामुळे लाड यांच्या राजीनामा नाट्यावर प्रदेशाध्यक्ष यांनी पडदा टाकला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्थानिक पातळीवर एकमेकाला समजून घेतले तर आघाडी चांगली होईल. आघाडीतील नेत्याने जिल्ह्यात पचवून घेणेही गरजेचे आहे. असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.

हे देखील पहा -

राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे परिवार संवाद मेळाव्याचे आयोजन जिल्ह्यात तीन दिवस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सुरू आहे. कर्जत येथे कार्यकर्ता परिसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी पाठ फिरवली होती. मेळाव्या दरम्यान लाड यांनी आपला पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष यांना पाठविला होता. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र सुरेश लाड यांनी कोणताही राजीनामा दिलेला नाही. उरण, पनवेल येथील कार्यक्रमात ते होते. त्याची मुलगी, भाऊ हे सुद्धा मेळाव्यात हजर असल्याचे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

अदिती तटकरे यांना पालकमंत्री पदावरून हटविण्यासाठी शिवसेना आमदारांनी आवाज उठविला होता. राज्यात तीन पक्षाचे सरकार असून आघाडीतील नेत्यांनी पचवून घेणे गरजेचे आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्थानिक पातळीवर एकमेकांनी समजून घेतले तर आघाडी चांगली होऊन यश मिळू शकते असेही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident : जालन्यात एसटी बस आणि ट्रक अपघातात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारे PHOTO पाहा

Chandrakant Patil News : खडसेंमुळेच राजकारणाचा स्तर खाली घसरलाय; आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप

Metro Ticket Booking: मेट्रोच्या तिकीटासाठी रांगेत उभं राहायची गरज नाही; काही मिनिटात ऑनलाइन तिकीट काढा

Maharashtra News Live Updates: दोन हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला अटक

Mahayuti News : महायुतीच्या पहिल्या यादीचा मुहूर्त ठरला, 40 उमेदवारांची घोषणा?

SCROLL FOR NEXT