लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर Saam Tv
महाराष्ट्र

लावणी सम्राज्ञीची निवडणूक लढण्याची इच्छा; शिवसंग्रामकडे तिकीटाची मागणी

देगलूर मतदार संघाचे आमदार रावसाहेब आंतापूरकर यांचे निधन झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर निवडणूक लढविण्यासाठी अनेक इच्छुकांनी गर्दी केली आहे.

संतोष जोशी

नांदेड: महाराष्ट्रात लावणी सम्राज्ञी म्हणून ओळख असलेल्या सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) यांनी विधानसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) देगलूर-बिलोली विधानसभा मतदार संघातून पुणेकर निवडणूक लढविणार आहेत. त्यांनी शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायकराव मेटे यांच्याकडे तशी मागणी केली आहे.

देगलूर मतदार संघाचे आमदार रावसाहेब आंतापूरकर यांचे निधन झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर निवडणूक लढविण्यासाठी अनेक इच्छुकांनी गर्दी केली आहे. आता तर थेट लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याने या निवडणूकीत आणखीनच रंगत येणार असल्याची चर्चा सुरेखा पुणेकर यांच्या चहात्यांत आहे. पुणेकर आज नांदेड मध्ये बोलत होत्या.

सुरेखा पुणेकर यांनी काल देगलूर मतदार संघात दौरा केला आणि आज त्यांनी नांदेडमध्ये सुरेखा पुणेकर यांनी निवडणूक लढविणार असून या देगलूरला घर करणार आहे आणि या भागातील समस्या जाणून घेणार आहे. शिवसंग्राम पक्षाने तिकीट दिल्यास आपण निवडून येऊन मतदार संघात विकास कामे करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धुळवडीच्या दिवशी काँग्रेसवर दु:खाचा डोंगर; माजी केंद्रीय मंत्र्यांचे निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra Live News Update : दुबईत अडकलेल्या यवतमाळच्या नागरिकांसाठी विशेष विमान

Sanju Samson: गंभीरने प्लेईंग ११ मधून काढल्यानंतर रोहित शर्माचे ४ मॅजिकल वर्ड्स, मॅचविनिंग खेळीनंतर हिटमॅन आणि संजूचा व्हिडीओ व्हायरल

Iran War: इराणच्या शाहीद-136 ड्रोनमुळे 14 देशांत हाय अलर्ट जारी, काय आहेत वैशिष्ट्ये?

अमेरिकेत ज्याची चर्चा, तो मेघालयचा मसाला आता तुमच्या दारात; जाणून घ्या काय आहे खास

SCROLL FOR NEXT