सोलापूर : तारीख पे तारीख हे सिनेमांत बरं वाटत. नारायण राणेंच्या सरकार कोसळण्याच्या भाकितावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उत्तर दिलं आहे. त्या आज सोलापूर दौऱ्यावर असताना बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, 'मी लाऊडस्पीकरच्या मुद्याकडे पाहात नाही, तर मी जनतेच्या प्रश्नांकडे पाहते, तसंच माझ्या भावाच्या घरी कधीच रेड झालेली नाही. माझ्या नवऱ्याला इन्कम टॅक्सची फक्त नोटीस आली होती असं सांगत त्यांनी राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) टीकेला सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलं.
सामाजिक, आर्थिक प्रश्न मांडण्यासाठी मी दिल्लीमध्ये असते. नेत्यांनी नेत्यांचे काम करावं आणि कार्यकर्त्याने कार्यकर्त्यांचे करावं. माझ्या घरावर झालेला हल्ला वाचवण्यासाठी महाराष्ट्राच्या पोलिसांचे (Maharashtra Police) मन:पूर्वक आभार माझा पोलिसांवर प्रचंड विश्वास असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान माझ्यावर यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत. त्यामुळं मी कोणाच्या कौटुंबिक विषयावर बोलतं नाही असं म्हणत त्यांनी गणेश नाईक यांच्या प्रश्नावर उत्तर दिलं. नवरा बायकोचा संसार आहे. महाविकास आघाडीचा ही संसार आहे, त्यामुळं भांड्याला भांड लागत मी पवार साहेबांची मुलगी आहे. मी सत्तेसाठी राजकारणात नाही असही त्या म्हणाल्या.
तसंच जून महिन्याच्या सुरुवातीला हे तीन पक्षांच सरकार पडणार असल्याचं भाकित भाजप नेते नारायण राणेंनी (Narayan Rane) केलं होतं त्यांच्या याच वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सुळे म्हणाल्या, 'तारीख पे तारीख हे सिनेमांत बरं वाटत,' असं म्हणत त्यांनी राणेंना टोलाही लगावला.
दरम्यान त्यांनी सिल्वर ओक (Silver Aok) वरील हल्ल्याची माहिती दिली. त्यांनी सांगितलं 'मी यशवंतराव चव्हाण सेंटरला जेवत असताना सिल्वर ओक वरती मॉब चालून येत असल्याची बातमी बघितली आणि हातातला घास सोडून घरी आले, त्यामुळे जो हल्ला झाला ती आपली लोक आहेत त्यांच्यापासून आपणाला कसली भीती, जो मॉब आमच्यावर आला ती आपली संस्कृती नसू शकते. मात्र, चर्चेतून यावर मार्ग निघू शकतो यावर माझा विश्वास आहे.
हे देखील पाहा -
ज्या महिला त्या दिवशी आमच्या घरी आलेल्या त्यांचा वेदना मला समजून घ्यायच्या होत्या त्या आंदोलनकर्त्यांची कोणी दिशाभूल करत असेल तर त्यांना समजावून सांगणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. पोलिसांनी मला आंदोलनकर्त्या 22 महिलांना भेटण्याची संधी दिली तर भेटेल राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे (Rahul Gandhi and Uddhav Thackeray) यांची भेट होणार असेल तर चांगलीच गोष्ट आहे असही त्या म्हणाल्या.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.