Supriya sule  Saam Tv
महाराष्ट्र

प्रताप सरनाईकांना ईडीकडून दिलासा मिळाल्यानंतर सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या...

शिंदे गटात गेलेले आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीकडून दिलासा मिळाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बारामती: शिंदे गटात गेलेले आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांना ईडीकडून दिलासा मिळाला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरनाईकांना ईडीने दिलासा दिला याचं मला काही आश्चर्य वाटत नाही, ही गोष्ट आधीच बोलली जात होती.

शिवाय भाजपमध्ये (BJP) गेलो तर आपल्याला ईडीचा त्रास होत नाही. असं भाजपचेच लोक बोलत आहेत. भाजपाकडे वॉशिंग मशीन आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

यावेळी त्यांनी वेदांता प्रकल्प (Vedanta Project) गुजरातला गेल्याच्या मुद्यावर देखील भाष्य केलं. त्या म्हणाल्या, तो प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता असं मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सगळ्या पक्षांची बैठक बोलवावी आणि वेदांचा प्रोजेक्ट परत द्यावा अशी पंतप्रधानांकडे मागणी करावी. तसंच या प्रकरणी सातत्याने दोन दिवस राष्ट्रवादीकडून आंदोलन केली असल्याचंही त्यांनी यावेळी म्हणाल्या.

पाहा व्हिडीओ -

यावेळी भाजपच्या बारामती मिशनवर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, भाजपच्या या भूमीकेचं पहिल्या दिवसापासून स्वागत करतं आहे. अर्थमंत्री जर बारामतीत येत असतील चांगली गोष्ट त्यांचं स्वागत करते. त्या इथे राहणार आहेत या भागाची स्थानिक प्रतिनिधी म्हणून मी त्यांना सहकार्य करेल. आमच्या घरीही स्वागत होईल असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aaditya Thackeray: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; वरळीतून आदित्य ठाकरे तिसऱ्यांदा आमदार

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातील २१ विधानसभा मतदारासंघाचा निकाल पाहा एका क्लिकवर

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

Dheeraj Deshmukh: लातूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, धीरज देशमुख यांचा पराभव

Vastu Tips : घराची तोडफोड न करताही दूर होऊ शकतो वास्तूदोष, जाणून घ्या सोपे उपाय

SCROLL FOR NEXT