supriya sule  Saam tv
महाराष्ट्र

Supriya Sule : '6 महिन्यात आणखी एक विकेट'; सुप्रिया सुळेंच्या निशाण्यावर महायुतीचा कोणता मंत्री? VIDEO

Supriya Sule Latest News : धनंजय मुंडेंनंतर महायुतीचा आणखी एक मंत्री विरोधकांच्या निशाण्यावर आलाय...पुढील 6 महिन्यात कोणत्या मंत्र्याचा राजीनामा होणार? आणि राऊतांनी नेमका काय दावा केलाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये

Bharat Mohalkar

धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय... त्यातच आता पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी 6 महिन्यात आणखी एका मंत्र्याची विकेट घेणार असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिलीय.

राज्यात प्रबळ विरोधी पक्ष नसतानाही महायुतीचे नेते अंतर्गत कुरघोड्यांमुळे हैराण असल्याचं दिसतंय... त्यातच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडचं कनेक्शन समोर आल्यामुळे धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.. तर अधिवेशनात जयकुमार गोरे, जयकुमार रावल, माणिकराव कोकाटे यांच्यासह अनेक मंत्र्यांना विरोधकांनी घेरलंय.. त्यातच आता सुळेंनी एक मंत्र्याची विकेट जाण्याचा दावा केला असला तरी संजय राऊतांनी मात्र हा आकडा 7 ते 8 असल्याचं म्हटलंय.. तर रोहित पवारांनी भ्रष्ट मंत्र्यांबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचं जाहीर केलंय..

एक नाही 7-8 मंत्र्यांचे बळी जाणार, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. 'जयकुमार गोरेंसह अनेक मंत्र्यांसंबंधी माझ्याकडे पुरावे, असं आमदार रोहित पवार म्हणाले.

महायुतीत मंत्रिपद न मिळाल्याने नाराजांची मोठी फौज आहे.. त्यातच सत्ताधारी आणि विरोधकांच्या दबावामुळे अखेर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला.. त्यानंतर आता आत्मविश्वास उंचावलेला विरोधी पक्ष कुणाची विकेट घेणार? कोणता मंत्री पत्नीच्या मागे लपतो? याबरोबरच विरोधी पक्षांना महायुतीतील नाराजीची फौजच दारुगोळा पुरवत आहे का? ...याचीच चर्चा रंगलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT